T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 99 3 outlets citing Entertainment IN

मनीष पॉल ने अवॉर्ड शो में कैटरीना कैफ का मजाक उड़ाने के लिए दबाव बनाने का दावा किया

अभिनेता मनीष पॉल ने खुलासा किया है कि उन्हें अवॉर्ड शो के दौरान कैटरीना कैफ का मजाक उड़ाने के लिए चैनल द्वारा कहा गया था। उन्होंने बताया कि उन्होंने इस निर्देश को मानने से इनकार कर दिया था।

First reported 3 hours ago · latest update 2 hours ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Maharashtra Times Authority 84

कतरिना कैफने जेव्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तेव्हा ती हिंदी भाषा शिकत होती आणि भाषेवरील मर्यादित प्रभुत्वामुळे अनेकदा तिची थट्टा केली जात असे. सार्वजनिक कार्यक्रम आणि रिअॅलिटी शोजमध्ये सूत्रसंचालक तिला कधीकधी हिंदी शब्द उच्चारायला सांगत असत, ज्यामुळे ती चारचौघात ओशाळून जायची. मनीष पॉलने सांगितले आहे की, त्याने सूत्रसंचालन केलेल्या कार्यक्रमांमध्ये कतरिनाला अशा अवघडल्यासारख्या प्रसंगांचा सामना करावा लागणार नाही याची त्याने जाणीवपूर्वक काळजी घेतली होती; यामुळेच त्यांच्यात एकदम खास मैत्री आहे.

Milind Gawali On Nana Patekar : पैसे खाणाऱ्या पोलिसवाल्याच्या घरी हे असं फालतू सामान? स्वस्तात काम निपटवणाऱ्या निर्मात्याला नाना पाटेकरांनी शिकवलेला धडा! 'झूम’ला दिलेल्या एका मुलाखतीत मनीष पॉलने कतरिना कैफसोबतच्या आपल्या मैत्रीबद्दल भाष्य केले. त्याने 'तीस मार खान' या चित्रपटात तिच्यासोबत काम केले होते, ज्यामध्ये अक्षय कुमारची मुख्य भूमिका होती. तो म्हणाला, "कतरिना असलेल्या एखाद्या चित्रपटात काम करण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. मला आजही चांगले आठवते की, जेव्हा ती सेटवर यायची तेव्हा मी खूप उत्साहित असायचो. आता ती माझी मैत्रीण आहे, पण त्या काळात तिची मुलाखत कोण घेणार यावरून आमची भांडणे व्हायची. ती खरोखरच खूप मिळून मिसळून वागणारी आणि अप्रतिम व्यक्ती आहे."

मनीष पॉलने यामागील कारण स्पष्ट केले, मी कधी तिच्या हिंदीची चेष्ठा नाही केली. खरं तर मला ही खूप कंटाळवाणी संकल्पना वाटली. तिला हिंदी येत नाही म्हणून काय झालं, तिला याची अधिक जाणीव करुन उगीच ओशाळू नये.

Human Trafficing Case : जोगेश्वरीची महिला चालवायची मानवी तस्करी रॅकेट, पोलिसांनी फेक ग्राहक बनून उधळला डाव, अभिनेत्रीची सुटका मनीषची कतरिना कैफसोबत चांगली मैत्री होती. त्याने पुढे सांगितले की, टेलिव्हिजन वाहिन्या अनेकदा सूत्रधारांना त्यांच्या कार्यक्रमांमध्ये अशा संकल्पनांचा समावेश करण्यास सांगत असत. “अनेकदा वाहिन्या आम्हाला असे करण्यास सांगायच्या, पण मी नेहमीच नकार द्यायचो."

मनीष पॉल आठवण सांगितली की, जेव्हा एखाद्या अभिनेत्रीचा एक्स जोडीदार मंचावर उपस्थित असायचा, तेव्हा त्याला त्यांच्या ब्रेकअपचा विषय काढण्याचा सल्ला दिला जायचा; मात्र, तो त्या सूचना केवळ मान्य करायचा पण त्यांची प्रत्यक्ष ते तो करत नसे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे ही आपली प्राथमिकता असल्याने, अशा सूचना कालांतराने विसरल्या जातील असे त्याला वाटायचे. दरम्यान, मनीष अलीकडेच 'द वन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट' प्रोजेक्टमदध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि तमन्ना भाटिया यांच्यासोबत दिसला होता; यात श्वेता तिवारी आणि अनुप सोनी यांचाही सहभाग होता.

↗ Read the original at Maharashtra Times

Citations · 3 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

84 Maharashtra Times ★ most authoritative citation

Manish Paul On Katrina Kaif : कतरिनाची खिल्ली उडवायला चॅनलवाल्यांनीच सांगितलेलं! मनीष पॉलने सांगितली अवॉर्ड शो ची दुसरी वाईट बाजू - Maharashtra Times

Manish Paul On Katrina Kaif : कतरिनाची खिल्ली उडवायला चॅनलवाल्यांनीच सांगितलेलं! मनीष पॉलने सांगितली अवॉर्ड शो ची दुसरी वाईट बाजू Maharashtra Times

3 hours ago
80 Google News Marathi Entertainment

Katrina Kaif: कतरिनाची खिल्ली उडवा.. चॅनलवाल्यांनी सांगितलं; नकार देत अभिनेता स्पष्टच बोलला - TV9 Marathi

Katrina Kaif: कतरिनाची खिल्ली उडवा.. चॅनलवाल्यांनी सांगितलं; नकार देत अभिनेता स्पष्टच बोलला TV9 Marathi

2 hours ago
79 TV9 Marathi

Katrina Kaif: कतरिनाची खिल्ली उडवा.. चॅनलवाल्यांनी सांगितलं; नकार देत अभिनेता स्पष्टच बोलला - TV9 Marathi

Katrina Kaif: कतरिनाची खिल्ली उडवा.. चॅनलवाल्यांनी सांगितलं; नकार देत अभिनेता स्पष्टच बोलला TV9 Marathi

2 hours ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app