T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 88 3 outlets citing Politics IN

महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ब्रिटिश कंपनियों के लिए नई पहल की घोषणा की

TV9 Marathi, Google News Marathi और Maharashtra Times सभी ने बताया कि मुख्यमंत्री फडणवीस ने राज्य में ब्रिटिश निवेश को आकर्षित करने के लिए उद्योग, शिक्षा और एआई पर एक रोडमैप प्रस्तुत किया। रिपोर्टों में इस पहल के विवरण में मामूली अंतर है, लेकिन मुख्य बिंदु समान हैं।

First reported 2 days ago · latest update 2 hours ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Maharashtra Times Authority 84

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पुण्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नगसेवक, आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?"पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघ याकरता पुणे शहर, पुणे जिल्हा, नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य यांची बैठक झाली. पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक झाली. पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे असे दोन उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून मैदानात उतरले आहेत", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.भैय्या माने आणि शरद लाड यांच्या माघारीवर भूमिका"अतिशय चांगली तयारी झाली आहे. विशेषत: पुणे पदवीधर मतदारसंघात आमचे शरद लाड यांनी चांगली तयारी केली होती. तसेच भैय्या माने यांनीदेखील खूप चांगली तयारी केली होती. या दोघांनी त्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन डॉ. स्मिता जाधव यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. आता कोल्हापूरमध्ये भैय्या माने यांनी कमान सांभाळली आहे. शरद लाड यांनी सांगली जिल्ह्यापासून सर्वत्र तयारी केली होती. त्यांनी ती कमान सांभाळली आहे", अशी माहिती फडणवीसांनी दिली.महायुतीचे उमेदवार जिंकतील असा फडणवीसांना विश्वास"भाजपचे सर्व कार्यकर्ते, आमदार, पदाधिकारी या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्या मतदारांपर्यंत पोहचून जास्तीत जास्त मतदान कसे होईल याचा प्रयत्न करतील. मला विश्वास आहे की, एकूणच विधान परिषदेच्या पाचही जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील. नागपूर, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक इथे भाजप निवडणूक लढवत आहे", असं ते म्हणाले.Tukaram Mundhe Action : तुकाराम मुंढे यांच्या एफडीएची अचानक धाड, झाडाझडतीत आढळल्या गंभीर त्रुटी, तब्बल 26 लाखांचे तेल जप्त"अमरावती शिक्षकमध्ये शिवसेनेची जागा आहे, त्याठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते शिवसेनेला निवडून आणतील. छत्रपती संभाजीनगर विभागात राष्ट्रवादीला जागा गेली आहे. त्या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवडून आणतील. पाचही जागा निवडून येतील हा विश्वास आहे. आजच्या बैठकीतील तयारी समाधानकारक आहे. या तयारीच्या ताकदीवर आम्ही निवडून येऊ", असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.'कोण कुणाच्याही जवळचे राहिले तरी...'यावेळी पत्रकारांनी सचिन सानप यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला. तसेच ते महायुतीमधील बड्या नेत्याच्या जवळचे आहेत, असं पत्रकारांनी म्हटलं. त्यावर फडणवीसांनी भूमिका मांडली.

"सचिन सानप हे अपक्ष उभे आहेत. आता सगळ्यांकरता प्रयत्न करता येत नाही. माझे मत असं आहे की, कुणाची कुणाशीही जवळीक असली तरी पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर या दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आणि मंत्री हे भाजपच्याच उमेदवारांचे काम करतील", असं फडणवीस म्हणाले.नगरसेवकांची कानउघाडणी केली का?"आज सगळे नगरसेवक होते. सगळे आमदार होते. कानउघाडणी केली नाही. काय अपेक्षा आहे ते सांगितलं आहे. निवडणूक लढवतो तेव्हा ती पूर्ण ताकदीने लढावी लागते. अनेकदा या निवडणुकीत लोकप्रतिनिधींना वाटतं की ही निवडणूक होऊन जाईल. पण तसं नसतं. प्रत्येकाला या निवडणुकीत सहभागी व्हायचं असतं. या निवडणुकीत जास्त लक्ष द्यायचं असतं", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.एकनाथ शिंदे नाराज आहेत का?पत्रकारांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांचा प्रश्न उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय मोजक्या शब्दांत भूमिका मांडली.

"एकनाथ शिंदे नाराज नाहीत. तुम्ही सर्व नाराज आहात. त्यामुळे विनाकारण त्यांच्याबद्दल अफवा पसरवतात", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

↗ Read the original at Maharashtra Times

Citations · 3 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

84 Maharashtra Times ★ most authoritative citation

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांवर फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय म्हणाले? - Maharashtra Times

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांवर फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय म्हणाले? Maharashtra Times

2 hours ago
80 Google News Marathi Technology

CM Devendra Fadnavis ब्रिटिश कंपन्यांसाठी महाराष्ट्रात नव्या संधी; फडणवीसांनी मांडला उद्योग, शिक्षण आणि AI चा रोडमॅप - The Focus India

CM Devendra Fadnavis ब्रिटिश कंपन्यांसाठी महाराष्ट्रात नव्या संधी; फडणवीसांनी मांडला उद्योग, शिक्षण आणि AI चा रोडमॅप The Focus India

12 hours ago
79 TV9 Marathi

Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना... - TV9 Marathi

Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना... TV9 Marathi

2 days ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app