Devendra Fadnavis addresses various policy, political, and regional issues in Maharashtra
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has made several public statements covering topics including the 'Ladki Bahin' scheme, regional development in Nashik, and political criticisms of the opposition. He also addressed administrative decisions, such as cabinet approvals for welfare schemes, and engaged in various public events across the state.
First reported 3 weeks ago · latest update 1 week agoमुख्यमंत्री फडणवीस यांनी दावा केला की, "माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार काँग्रेसच्या नेत्यांकडून संचालित महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची नोंदणी करून त्यांनाच या कार्यक्रमात आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्याही आपल्याच मुली आहेत आणि राहुल गांधी त्यांच्याशी संवाद साधत आहेत याचा आनंद आहे. ‘छात्र संवाद’ असे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचे नाव देण्यात आले आहे. हा कार्यक्रम खुला ठेवला असता आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभागी होता आले असते, तर अधिक चांगले झाले असते. मात्र, पुणे आणि पुण्याच्या आसपास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या किंवा नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थांमधील मुला-मुलींनाच या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले आहे. काँग्रेसच्या शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनाच या कार्यक्रमात प्रवेश दिला जात असल्याने राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम एका नियंत्रित वातावरणात होत आहे," असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
दरम्यान, ‘वंदे मातरम्’च्या दोनच कडव्यांच्या मुद्द्यावरूनही फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. स्वतंत्र भारताच्या संसदेत घेतलेला निर्णय न मानणे ही संविधानविरोधी भूमिका असल्याचे ते म्हणाले. भारतात आता इंग्रजांचे राज्य नाही, भारत स्वतंत्र आहे, भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय हा संविधानिक असतो. स्वतंत्र भारताच्या संसदेत घेतलेला निर्णय न मानणे आणि गुलामीच्या परंपरेचे पालन करणे, हे मानसिक गुलामीचे लक्षण आहे. संविधानाच्या विरोधात वागण्याची मानसिकता अशा वक्तव्यांतून दिसून येते, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या निर्णयाचेही देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले. विद्यापीठे ही देशाचे भविष्य घडवणारी केंद्रे आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास सरकारची दिशा, देशासमोरील आव्हाने आणि जगातील बदल याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि भावना थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचतील, असे त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. योजनेचे नियम आणि निकष ठरवण्यात आले असून लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एक कोटी ६५ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून त्या पात्र ठरल्या आहेत. पात्र महिलांना कोणताही खंड न पडता योजनेचे पैसे मिळत राहतील, असे त्यांनी सांगितले. काही लाभार्थ्यांच्या कुटुंबात आयकर भरणारे सदस्य असल्याचे, तर काही महिला सरकारी नोकरीत असल्याचे पडताळणीत समोर आले. अशा अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. काही पुरुष लाभार्थीही आढळून आले असून त्यांनाही योजनेतून थेट वगळण्यात आले आहे.
Citations · 15 reports from 5 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Devendra Fadnavis: राहुल गांधींचा पुण्यात संवाद कार्यक्रम; विद्यार्थिनींच्या सहभागावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी केला गंभीर आरोप - Maharashtra Times
Devendra Fadnavis: राहुल गांधींचा पुण्यात संवाद कार्यक्रम; विद्यार्थिनींच्या सहभागावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी केला गंभीर आरोप Maharashtra Times
3 weeks agoDevendra Fadnavis | कर्जमाफी, महिला आरक्षण ते सुट्टे खाद्यतेलापर्यंत, मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय - Maharashtra Times
Devendra Fadnavis | कर्जमाफी, महिला आरक्षण ते सुट्टे खाद्यतेलापर्यंत, मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय Maharashtra Times
3 weeks agoDevendra Fadnavis | अमराठी टॅक्सी, रिक्षा चालक संघटनांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा - Maharashtra Times
Devendra Fadnavis | अमराठी टॅक्सी, रिक्षा चालक संघटनांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा Maharashtra Times
2 weeks agoDevendra Fadnavis : सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, फडणवीसांची टीका, डीजे वादावरही भाष्य - Maharashtra Times
Devendra Fadnavis : सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, फडणवीसांची टीका, डीजे वादावरही भाष्य Maharashtra Times
2 weeks agoDevendra Fadnavis: राहुल गांधी लक्ष्य, महिला आरक्षणाचे मारेकरी असल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात - Maharashtra Times
Devendra Fadnavis: राहुल गांधी लक्ष्य, महिला आरक्षणाचे मारेकरी असल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात Maharashtra Times
2 weeks agoDahi Handi Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र फडणवीसांनी फोडली दहीहंडी; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? - Esakal
Dahi Handi Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र फडणवीसांनी फोडली दहीहंडी; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? Esakal
1 week agoDevendra Fadnavis : महाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Prahaar.in
Devendra Fadnavis : महाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Prahaar.in
3 weeks agoCM Devendra Fadnavis : येत्या ५ वर्षांत नाशिक बनेल महाराष्ट्राचं Growth Engine - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Prahaar.in
CM Devendra Fadnavis : येत्या ५ वर्षांत नाशिक बनेल महाराष्ट्राचं Growth Engine - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Prahaar.in
2 weeks agoDevendra Fadnavis: ‘दिल्लीत जाणार नाही!’ फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं; पंतप्रधानपदाबाबत केलं मोठं भाष्य, नेमकं काय म्हणाले? - Pudhari
Devendra Fadnavis: ‘दिल्लीत जाणार नाही!’ फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं; पंतप्रधानपदाबाबत केलं मोठं भाष्य, नेमकं काय म्हणाले? Pudhari
2 weeks agoDevendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा राज्यातील आवडता हिंदुत्ववादी नेता कोण? मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर - Pudhari
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा राज्यातील आवडता हिंदुत्ववादी नेता कोण? मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर Pudhari
1 week agoDevendra Fadnavis : "काळजी त्यावेळेस वाटेल..." : एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्यावर CM फडणवीसांची मिश्कील टोलेबाजी - pudhari.news
Devendra Fadnavis : "काळजी त्यावेळेस वाटेल..." : एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्यावर CM फडणवीसांची मिश्कील टोलेबाजी pudhari.news
1 week agoDevendra Fadnavis: "त्यांची मराठी ट्रेंडिंग, मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल; पण..." मुख्यमंत्री फडणवीसांचा बापटांना थेट सल्ला - Pudhari
Devendra Fadnavis: "त्यांची मराठी ट्रेंडिंग, मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल; पण..." मुख्यमंत्री फडणवीसांचा बापटांना थेट सल्ला Pudhari
1 week agoDevendra Fadnavis : लाडकी बहिण योजनेचे पैसे कधीपर्यंत मिळत राहणार? देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाची... - TV9 Marathi
Devendra Fadnavis : लाडकी बहिण योजनेचे पैसे कधीपर्यंत मिळत राहणार? देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाची... TV9 Marathi
3 weeks agoDevendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं? - TV9 Marathi
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं? TV9 Marathi
3 weeks agoCM Devendra Fadnavis : धमक्या दिल्या तर नेस्तनाबूत करून टाकू; CM देवेंद्र फडणवीसांकडून ओपन चॅलेंज,... - TV9 Marathi
CM Devendra Fadnavis : धमक्या दिल्या तर नेस्तनाबूत करून टाकू; CM देवेंद्र फडणवीसांकडून ओपन चॅलेंज,... TV9 Marathi
2 weeks ago