एकनाथ शिंदेच्या भाषणात मराठा आंदोलकांची घोषणा व जरांगेचा उल्लेख
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक सभेत मराठा आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीत सहभाग घेतला आणि जरांगेचा उल्लेख केला. विविध मराठी माध्यमे या घटनाचे वर्णन करतात, परंतु तपशीलांमध्ये काही फरक आहे, काहींनी गोंधळाची नोंद केली तर इतरांनी शिंदेच्या भावनिक टिप्पणीवर भर दिला.
First reported 2 weeks ago · latest update 1 week agoएकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज परभणीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार बंडू जाधव यांच्याकडून या भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या कार्यक्रमाला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. ते कालपासून उपोषणाला बसले आहेत.
एकीकडे जरांगे मराठवाड्यात उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातच जंगी शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी या कार्यक्रमाला विरोध केला. त्यांनी बंडू जाधव यांना फोन करुन संबंधित कार्यक्रमाचं आयोजन करु नये, असं आवाहन केलं. पण बंडू जाधव यांनी कार्यक्रमाचं नियोजन पूर्ण झालं आहे. सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळे कार्यक्रम रद्द करणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
"मनोज जरांगे पाटील यांची तळमळ मला माहिती आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता समजासाठी लढतोय. मी मुख्यमंत्री असताना दोनवेळा जरांगेंच्या भेटीसाठी गेलो होतो. आतादेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी कायदेशीर बाबी तपासण्यासाठी आपले मंत्री पाठवले. मराठा समाज हा कष्टकरी आहे. इतर समाजाचं आरक्षण कमी न करता आपल्याला आरक्षण देण्याची भूमिका आम्ही घेतली. कित्येक वर्षांपासून मराठा समजाला आरक्षण मिळावी ही मागणी केली जात आहे. महायुतीच्या सरकारपासून मराठा समाजाला न्याय देण्याच काम झालं", अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
Citations · 5 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Eknath Shinde : भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, एकनाथ शिंदे यांचं जरांगेंचा उल्लेख करत भावनिक भाष्य - Maharashtra Times
Eknath Shinde : भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, एकनाथ शिंदे यांचं जरांगेंचा उल्लेख करत भावनिक भाष्य Maharashtra Times
2 weeks agoEknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार? - Esakal
Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार? Esakal
1 week agoEknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक… - TV9 Marathi
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक… TV9 Marathi
2 weeks agoEknath Shinde : उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसणार, पुन्हा फोडाफोडी होणार? एकनाथ शिंदेंकडून 4 नेत्यांवर... - TV9 Marathi
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसणार, पुन्हा फोडाफोडी होणार? एकनाथ शिंदेंकडून 4 नेत्यांवर... TV9 Marathi
2 weeks agoEknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का; अधिकारात केली मोठी कपात - TV9 Marathi
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का; अधिकारात केली मोठी कपात TV9 Marathi
1 week ago