गणेश चतुर्थी 2026: तिथि, पूजा विधि और मोदक से जुड़ी पौराणिक कथा
मराठी माध्यमों ने 2026 के गणेश चतुर्थी के विभिन्न पहलुओं पर विस्तृत जानकारी दी, जिसमें तिथि, प्राणप्रतिष्ठा का शुभ मुहूर्त, मोदक का धार्मिक महत्व और पूजा विधियों की सलाह शामिल है। सभी लेख एक ही तिथि (14 सितंबर) को प्रमुख मानते हैं और पारंपरिक रीति‑रिवाज़ों पर ज़ोर देते हैं।
First reported 6 days ago · latest update 19 hours ago
Ganesha Origin History through ancient coins: गणपती या देवतेची लोकप्रियता केवळ भारतीय उपखंडापुरती मर्यादित राहिलेली नाही. मुख्य प्रवाहातील हिंदू देवतापरंपरांपासून तंत्र परंपरेपर्यंत गणेशाला महत्त्वाचे स्थान मिळाले. इतकेच नव्हे, तर बौद्ध आणि जैन धार्मिक परंपरांमध्येही वेगवेगळ्या काळात गणेशाची रूपे सामावून घेतली गेली. त्यामुळे आज आपल्याला परिचित असलेला गजानन हा एका प्रदीर्घ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीचा परिणाम असल्याचे दिसते.
पुराणांपासून लोकसाहित्यापर्यंत गणपती वेगवेगळ्या रूपांत सातत्याने समोर येतो. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या विदेशी अभ्यासकांनाही त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण हत्तीमुख असलेल्या रूपाने आणि त्यामागील प्रतीकविश्वाने आकर्षित केले. मात्र, गणेशाच्या या स्वरूपाचा नेमका उगम कधी आणि कसा झाला, हा प्रश्न आजही पूर्णपणे सुटलेला नाही.
या प्रश्नाचे उत्तर शोधताना साहित्यिक पुराव्यांबरोबरच नाणकशास्त्रातील काही विलक्षण पुरावेही समोर येतात. अफगाणिस्तानातील प्राचीन कपिशाशी संबंधित एका इंडो-ग्रीक नाण्यावर दिसणारी नगरदेवता, तिच्या डोक्यावर असलेला हत्तीचा मुखवटा आणि पर्वताचे चिन्ह यामुळे हे नाणे गणेशाच्या उद्गमाविषयीच्या संशोधनातील एक महत्त्वाचा दुवा मानले गेले आहे.
हेही वाचाभारताआधीच आग्नेय आशियातील देशांमध्ये गणपती लोकप्रिय का झाला? तिथे गणपती कसा पोहोचला?
इतिहास समजून घेण्यासाठी नाणी महत्त्वाची का?
कोणत्याही प्राचीन समाजाच्या इतिहासाचा अभ्यास केवळ राजवंशांच्या किंवा युद्धांच्या नोंदींमधून होत नाही. त्या समाजाची अर्थव्यवस्था, व्यापार, धार्मिक श्रद्धा, राजकीय सत्ता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण समजून घेण्यासाठी नाणी अत्यंत महत्त्वाचा पुरातत्त्वीय स्रोत ठरतात.
एखादे नाणे कोणी पाडले, त्यावर कोणत्या राजाची प्रतिमा आहे, कोणती देवता दर्शवण्यात आली आहे, कोणती लिपी आणि भाषा वापरण्यात आली आहे, कोणती धार्मिक किंवा राजकीय चिन्हे आहेत. या प्रत्येक बाबीतून तत्कालीन समाजाविषयी माहिती मिळू शकते. म्हणूनच नाणकशास्त्र म्हणजे केवळ प्राचीन चलनाचा अभ्यास नाही. तर राजकीय सार्वभौमत्वापासून धार्मिक कल्पनांच्या प्रसारापर्यंत अनेक ऐतिहासिक प्रक्रियांचा मागोवा त्यातून घेता येतो. गणेशाच्या उद्गमाचा शोध घेतानाही नाण्यांवरील हत्तीची प्रतिमा आणि हत्तीशी संबंधित स्थानिक देवतांचे पुरावे महत्त्वाचे ठरतात.
वेदांतील ‘गणपति’ म्हणजे आजचा गणेश का?
आजच्या गणेशाचे रूप एकाच वेळी किंवा एकाच कालखंडात तयार झालेले नाही. ऋग्वेदातील प्रसिद्ध “गणानां त्वा गणपतिं हवामहे…” या मंत्रातील ‘गणपति’ शब्दाचा संबंध ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पतीशी जोडला जातो. त्यामुळे वेदांतील ‘गणपति’ म्हणजेच आजचा हत्तीमुख असलेला गणेश, असे सरळ समीकरण करणे योग्य ठरत नाही. गणांचा अधिपती ही संकल्पना, विनायक परंपरा, यक्ष-संस्कृती, हत्तीशी संबंधित धार्मिक प्रतीके आणि विविध स्थानिक देवतांच्या संकल्पना या दीर्घ ऐतिहासिक प्रक्रियेत एकमेकांशी जोडल्या गेल्या असाव्यात आणि त्यातून पुढे गणेशाचे परिचित स्वरूप आकारास आले असावे, असे काही अभ्यासक मानतात.
भारतीय संस्कृतीत हत्तीचे प्राचीन महत्त्व
भारतीय धार्मिक-सांस्कृतिक विश्वात हत्तीला फार प्राचीन काळापासून विशेष स्थान आहे. संस्कृतमधील ‘हस्तिन्’ या शब्दाचा संबंध ‘हस्त’ म्हणजे हात याच्याशी जोडला जातो. सोंडेचा वापर हाताप्रमाणे करता येत असल्यामुळे हत्तीला ‘हस्तिन्’ म्हटले गेले. परंतु हत्तीचे महत्त्व केवळ भाषेत किंवा राजसत्तेच्या लष्करी सामर्थ्यातच दिसत नाही. तर धार्मिक परंपरांमध्येही हत्तीशी संबंधित श्रद्धांचे पुरावे आढळतात. यासंदर्भात बौद्ध साहित्यातील ‘हत्थिवतिक’ यांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो.
कोण होते ‘हत्थिवतिक’?
खुद्दक निकायाशी संबंधित ‘महानिद्देस’ या पाली ग्रंथात विविध प्रकारची व्रते स्वीकारणाऱ्या श्रमण- ब्राह्मणांचा उल्लेख येतो. त्यामध्ये ‘हत्थिवतिक’ (Hatthivatikā), ‘अस्सवतिक’, ‘गोवतिक’, ‘कुक्कुरवतिक’ अशा संज्ञा आढळतात. ‘हत्थि’ म्हणजे हत्ती, तर ‘वतिक’चा संबंध विशिष्ट व्रत किंवा आचार पाळणाऱ्याशी जोडला जातो. विशेष म्हणजे त्याच यादीत वासुदेव, बलदेव, मणिभद्र, अग्नी, नाग, यक्ष, इंद्र आणि ब्रह्मा यांच्याशी संबंधित व्रतधारकांचाही उल्लेख आहे. त्यामुळे प्राचीन भारतीय धार्मिक विश्वात हत्तीशी निगडित स्वतंत्र धार्मिक आचार किंवा व्रतपरंपरा अस्तित्वात असण्याची शक्यता या उल्लेखातून दिसते. मात्र, या हत्थिवतिकांना थेट गणेशोपासक म्हणता येत नाही.
गणेशाच्या इतिहासात अफगाणिस्तान का महत्त्वाचे?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भारताच्या वायव्य सीमेपलीकडे, आजच्या अफगाणिस्तानातील प्राचीन कपिशा प्रदेशाकडे जावे लागते. इ.स.पू. ३२६ मध्ये अलेक्झांडरने सिंधू नदी ओलांडून भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात प्रवेश केला. तो तक्षशिलेला आला. त्यानंतर झेलम नदीच्या परिसरात पोरसशी त्याची प्रसिद्ध लढाई झाली. त्याचे सैन्य पुढे बियास नदीपर्यंत गेले; मात्र सैनिकांनी पुढील मोहिमेस नकार दिल्यानंतर त्याला परतीचा मार्ग स्वीकारावा लागला. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर या संपूर्ण प्रदेशात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. पुढील काळात बॅक्ट्रिया आणि हिंदुकुशच्या दक्षिणेकडील प्रदेशात ग्रीको-बॅक्ट्रियन आणि इंडो-ग्रीक राजसत्ता उदयाला आल्या. याच राजकीय-सांस्कृतिक विश्वात युक्रेटायडिस प्रथम या ग्रीको-बॅक्ट्रियन राजाचे नाव महत्त्वाचे ठरते.
युक्रेटायडिसच्या नाण्यावरची रहस्यमय नगरदेवता
युक्रेटायडिस प्रथम याचा कालखंड साधारण इ.स.पू. १७० ते १४५ असा मानला जातो. त्याच्या कारकिर्दीत बॅक्ट्रियापासून हिंदुकुशच्या दक्षिणेकडील प्रदेशांपर्यंत मोठ्या प्रमाणावर लष्करी आणि राजकीय हालचाली झाल्या. त्याच्याशी संबंधित एका वैशिष्ट्यपूर्ण नाण्यामुळे गणेशाच्या उद्गमाविषयीच्या चर्चेला वेगळे वळण मिळाले. या नाण्याच्या दर्शनी बाजूस शिरस्त्राण आणि राजमुकुटीय पट्टा धारण केलेल्या युक्रेटायडिसचा अर्धपुतळा आहे. त्याभोवती ग्रीक भाषेतील लेख आहे.
कपिशाची नगरदेवता आणि हत्ती
मात्र, नाण्याची मागील बाजू अधिक लक्षवेधी आहे. तेथे सिंहासनावर बसलेली एक देवता दाखवण्यात आली आहे. तिच्याजवळ हत्तीचा पुढील भाग किंवा हत्तीचे मस्तक दिसते. दुसऱ्या बाजूस पर्वतासारखे चिन्ह आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे नाण्यावर खरोष्ठी लिपीत ‘कपिशाची नगरदेवता’ असा अर्थ असलेली कोरीव नोंद आहे. या नाण्याच्या अभ्यासात देवतेची नेमकी ओळख आणि चिन्हांचे अर्थ यांवर वेगवेगळी मते व्यक्त झाली असली, तरी कपिशाशी संबंधित नगरदेवतेचा स्पष्ट संदर्भ आणि तिच्याबरोबर दिसणारे हत्ती व पर्वत ही दोन प्रतीके विशेष लक्षवेधी ठरतात.
हेही वाचाज्येष्ठागौरीचे गणपतीशी असलेले नाते नेमके काय आहे? तिचा इतिहास व परंपरा काय सांगते?
देवता स्त्री की पुरुष?
या नाण्यावरील देवतेची नेमकी प्रतिमाशास्त्रीय ओळख नाणकशास्त्रात दीर्घकाळ चर्चेचा विषय राहिली आहे. काही सुरुवातीच्या अभ्यासकांनी सिंहासनावर आरूढ झालेल्या आकृतीची तुलना ग्रीक देवता झ्यूसशी (Zeus) केली. ए. के. नरेन यांनी मात्र या प्रतिमेचा संबंध कपिशाच्या स्थानिक नगरदेवतेशी जोडला. काही अभ्यासकांनी ग्रीक परंपरेतील शहररक्षक देवी ‘टायके’शी (Tyche) तिचे साम्य दाखवले. डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. नाण्यावरील लेखातच कपिशाच्या नगरदेवतेचा संदर्भ असल्यामुळे प्रतिमा कोणत्याही विशिष्ट ग्रीक देवतेची आहे की स्थानिक देवतेची, यापेक्षा तिचे कपिशाच्या धार्मिक विश्वाशी असलेले नाते अधिक महत्त्वाचे ठरते, असा त्यांच्या मांडणीचा आशय आहे.
ह्युएन त्सांगने काय पाहिले?
सातव्या शतकात भारतात आलेल्या ह्युएन त्सांग (Xuanzang) या चिनी बौद्ध प्रवाशाने कपिशा प्रदेशाचे एक अत्यंत महत्त्वाचे वर्णन नोंदवले आहे. त्याच्या वृत्तान्तानुसार कपिशा शहराच्या नैऋत्येला ‘पि-लो-सा-लो’ (Pīlusāra) नावाचा पर्वत होता. त्या पर्वताशी संबंधित स्थानिक देवता किंवा spirit हत्तीचे रूप धारण करत असे, अशी परंपरा तेथे प्रचलित होती. ह्युएन त्सांगने या हत्तीरूप असलेल्या देवतेशी जोडलेली बुद्धाची एक कथाही नोंदवली आहे. या देवतेने बुद्ध आणि १,२०० अर्हतांना भोजनासाठी आमंत्रित केले होते. पुढे त्याच खडकावर सम्राट अशोकाने स्तूप उभारल्याचेही त्याच्या वर्णनात येते.
हत्तीमुख असलेल्या देवतेचे शतकांचे सातत्य
नाणकशास्त्राच्या दृष्टीने ही नोंद विशेष लक्षवेधी आहे. कारण ह्युएन त्सांगच्या सातव्या शतकातील प्रवासाच्या सुमारे आठशे वर्षे आधी युक्रेटायडिसच्या नाण्यावर कपिशाच्या नगरदेवतेबरोबर हत्ती आणि पर्वताशी संबंधित चिन्हे दिसतात. दुसरीकडे, सातव्या शतकात Xuanzang त्याच कपिशा प्रदेशातील पर्वताशी संबंधित हत्तीरूप असलेल्या रक्षणकर्त्या देवतेची परंपरा नोंदवतो. या दोन पुराव्यांमध्ये थेट आणि अखंड धार्मिक सातत्य सिद्ध झालेले नाही. तरीही कपिशाच्या धार्मिक भूगोलात हत्ती आणि पर्वत या दोन प्रतीकांचे दीर्घकाळ टिकलेले महत्त्व सूचित करणारे हे साम्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय ठरले आहे.
हेही वाचाकोण आहे ही ‘निर्ऋती’?; जी ठरली ‘ज्येष्ठागौरी’!
हा ‘आद्य गणेश’ आहे का?
कपिशाच्या या नाण्यावरील हत्तीचे प्रतीक आणि स्थानिक नगरदेवतेची परंपरा पुढील गणेश-संकल्पनेशी संबंधित होती का, याच प्रश्नावर अभ्यासकांमध्ये सर्वाधिक मतभेद आहेत. ए. के. नरेन यांच्यासारख्या विद्वानांनी कपिशाची नगरदेवता, हत्ती आणि ‘पि-लो-सा-लो’ (Pīlusāra) पर्वताची परंपरा यांचा संबंध गणेशाच्या प्रारंभिक संकल्पनेशी जोडण्याचा प्रयत्न केला. डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनीही गणेशाच्या उत्पत्तीचा शोध घेताना हत्तीशी संबंधित अशा प्राचीन धार्मिक परंपरांना महत्त्व दिले. या मांडणीनुसार, गणेशाची आज दिसणारी पूर्ण विकसित हत्तीमुख असलेली मानवरूपी प्रतिमा आकारास येण्यापूर्वी हत्तीशी संबंधित स्थानिक देवता, यक्षपरंपरा, नगररक्षक देवता आणि इतर धार्मिक कल्पना अस्तित्वात असाव्यात आणि नंतर विविध धार्मिक-सांस्कृतिक प्रवाहांच्या संगमातून परिचित गणेशस्वरूप विकसित झाले असावे.
मात्र, या मांडणीला सर्वमान्यता नाही. कपिशाच्या नाण्यावर ‘गणेश’ असे कुठेही लिहिलेले नाही. त्यावरील हत्तीचे चिन्ह स्वतः गणेश असल्याचेही सिद्ध होत नाही. त्याचप्रमाणे कपिशाच्या नगरदेवतेपासून पुढील पुराणकालीन गणेशापर्यंत अखंड धार्मिक परंपरा दाखवणारे पुरावेही आपल्याकडे नाहीत. या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा वाद कथित ‘हत्तीमुख असलेल्या देवते’च्या काही नाण्यांभोवती निर्माण झाला. ए. के. नरेन यांनी अशा काही नाण्यांवरील प्रतिमेला गणेशाच्या सर्वात प्राचीन रूपाशी जोडले होते. मात्र, नाणकशास्त्रज्ञ जो क्रिब आणि नंतर ऑस्मंड बोपेआराची (Osmund Bopearachchi) यांनी त्यावर गंभीर आक्षेप घेतले. बोपेआराची यांच्या मते, या नाण्यांवरील तपशीलांचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे त्यांनी त्या प्रतिमेला गणेश मानण्यास स्पष्ट विरोध केला.
हत्तीमुख असलेली स्थानिक रक्षणकर्ती देवता
त्यामुळे युक्रेटायडिसचे कपिशा नाणे किंवा इतर इंडो-ग्रीक परंपरेतील प्रतिमा यांना सरळ ‘सर्वात प्राचीन गणेश’ म्हणणे योग्य ठरणार नाही, असे काही अभ्यासकांचे मत आहे. मात्र, या वादामुळे या पुराव्यांचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. उलट, गणेशाची विकसित हत्तीमुख असलेली प्रतिमा उदयाला येण्याआधीच भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात हत्ती, स्थानिक रक्षणकर्त्या देवता, नगरदेवता आणि धार्मिक भूगोल यांच्यात गुंतागुंतीचे संबंध अस्तित्वात होते, हे या पुराव्यांतून अधोरेखित होते.
Citations · 9 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Ganesh Chaturthi 2026: बौद्ध साहित्यातील ‘हत्थिवतिक’ परंपरेचा गणेशाशी काय संबंध? अफगाणिस्तानातील नाणी कोणता इतिहास सांगतात? - Loksatta
Ganesh Chaturthi 2026: बौद्ध साहित्यातील ‘हत्थिवतिक’ परंपरेचा गणेशाशी काय संबंध? अफगाणिस्तानातील नाणी कोणता इतिहास सांगतात? Loksatta
1 day agoGanesh Chaturthi 2026: एकाच देवाची १०८ नावं कशी? भाषाविज्ञान काय सांगतं? - Loksatta
Ganesh Chaturthi 2026: एकाच देवाची १०८ नावं कशी? भाषाविज्ञान काय सांगतं? Loksatta
1 day agoGanesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का घेऊ नये? एका चुकीमुळे चंद्राला मिळाला बाप्पाचा भयानक शाप; वाचा पौराणिक कथा! - Loksatta
Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का घेऊ नये? एका चुकीमुळे चंद्राला मिळाला बाप्पाचा भयानक शाप; वाचा पौराणिक कथा! Loksatta
19 hours agoGanesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा - Saam Tv
Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा Saam Tv
5 days agoGanesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ! - Esakal
Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ! Esakal
4 days agoGanesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी.... - Esakal
Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी.... Esakal
4 days agoGanesh Chaturthi 2026: फिल्मी अवतार की शास्त्रोक्त रूप? गणेश चतुर्थीला कशी असावी बाप्पाची मूर्ती? जाणून घ्या नियम! - Esakal
Ganesh Chaturthi 2026: फिल्मी अवतार की शास्त्रोक्त रूप? गणेश चतुर्थीला कशी असावी बाप्पाची मूर्ती? जाणून घ्या नियम! Esakal
3 days agoGanesh Chaturthi 2026: गुरुजी नाहीत? चिंता करू नका; घरीच मंत्रोच्चारासह अशी करा गणरायाची प्राणप्रतिष्ठा! वाचा संपूर्ण शास्त्रोक्त पद्धत... - Esakal
Ganesh Chaturthi 2026: गुरुजी नाहीत? चिंता करू नका; घरीच मंत्रोच्चारासह अशी करा गणरायाची प्राणप्रतिष्ठा! वाचा संपूर्ण शास्त्रोक्त पद्धत... Esakal
1 day agoGanesh Chaturthi 2026 : हरितालिका-गणेश चतुर्थी एकाच दिवशी, उपवास कधी सोडावा? - Pudhari
Ganesh Chaturthi 2026 : हरितालिका-गणेश चतुर्थी एकाच दिवशी, उपवास कधी सोडावा? Pudhari
6 days ago