T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 82 3 outlets citing India IN

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE - Esakal

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE Esakal

First reported 6 days ago · latest update 4 days ago
T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Sakal Authority 83

Apple Surprise and Shine Event 2026: जागतिक टेक दिग्गज Apple चा बहुप्रतिक्षित वार्षिक हार्डवेअर इव्हेंट 'Surprise and Shine' आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी आयोजित केला जात आहे. कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथील ॲपल पार्क मधील 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये हा सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि लीक्सवर आज पूर्णविराम मिळणार आहे. या इव्हेंटमध्ये काय खास असणार आहे आणि तो लाईव्ह कसा पाहायचा, याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे- .LIVE इव्हेंट कधी अन् कुठे पाहायचा?वेळ: हा इव्हेंट अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 10:00 (10am PT) वाजता सुरू होईल. भारतीय वेळेनुसार (IST) आज रात्री 10:30 वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.कसे पाहायचे: ॲपल प्रेमी हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर (Apple.com), ॲपलच्या अधिकृत YouTube चॅनेलवर आणि Android व iOS दोन्हीवर उपलब्ध असलेल्या Apple TV ॲपवर थेट लाईव्ह पाहू शकतात..iPhone 18 लॉंच आधीच iPhone 17 Pro वर मोठा डिस्काउंट!

Flipkartवर किंमत घसरली; अशी मिळवा bank offer... .iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxकंपनी या इव्हेंटमध्ये प्रो व्हेरिअंट्स सादर करण्याची दाट शक्यता आहे.डिस्प्ले अन् डिझाईन: iPhone 18 Pro मध्ये 6.3-इंच आणि Pro Max मध्ये 6.9-इंचचा LTPO+ डिस्प्ले मिळू शकतो. यामध्ये डायनॅमिक आयलंडचा आकार आणखी लहान केला जाण्याची शक्यता आहे.कॅमेरा अपग्रेड: Pro Max च्या मुख्य कॅमेऱ्यामध्ये 'वेरिएबल ॲपर्चर' तंत्रज्ञान दिले जाऊ शकते, ज्यामुळे युझर्सना लाईट आणि डेप्थ ऑफ फील्डवर उत्कृष्ट कंट्रोल मिळेल.प्रोसेसर अन् कलर्स: TSMC च्या 2nm प्रोसेसवर आधारित शक्तिशाली A20 चिप यामध्ये मिळेल. हे फोन्स लाईट ब्लू, डार्क ग्रे, सिल्व्हर आणि डीप रेड / डार्क चेरी फिनिशमध्ये उपलब्ध होऊ शकतात..Apple चा पहिला फोल्डेबल फोन: 'iPhone Ultra'या इव्हेंटमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन ठरू शकतो, ज्याला iPhone Ultra नाव दिले जाण्याची शक्यता आहे.डिस्प्ले: या बुक-स्टाईल फोनमध्ये बाहेर 5.5-इंची स्क्रीन आणि आत 7.8-इंची (4:3 आस्पेक्ट रेशिओ) मुख्य स्क्रीन असेल.स्लिम डिझाईन: अनफोल्ड केल्यावर हा फोन अवघा 4.5mm इतका पातळ असेल. यात टायटॅनियम आणि ॲल्युमिनियम फ्रेम दिली जाऊ शकते.फीचर्स अन् किंमत: स्लिम डिझाईनमुळे यात Face ID ऐवजी Touch ID आणि ट्रिपल ऐवजी ड्युअल कॅमेरा मिळू शकतो. याची सुरुवातीची किंमत $2,000 (सुमारे 1.9 लाख रुपये) पेक्षा जास्त असू शकते..iPhone 18 Pro खरेदी करायचाय? सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च; घेण्याआधी हे वाचा, किमतीबाबत मोठी अपडेट समोर.Apple Watch Series 12 आणि AirPods 5Apple Watch Series 12: नव्या S-सिरिज चिपसेटसह ही वॉच येईल, ज्यामुळे उत्तम बॅटरी लाईफ मिळेल. यात नवीन हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स आणि दीर्घकाळानंतर 'सिरेमिक केस' पर्याय परत येऊ शकतो.AirPods 5: ॲपल आपले एंट्री-लेव्हल इयरबड्स अपग्रेड करत आहे. हे इयरबड्स ANC (ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन) आणि नॉन-ANC अशा दोन व्हेरिअंट्समध्ये लाँच केले जाऊ शकतात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News.

Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

↗ Read the original at Sakal

Citations · 3 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

83 Sakal ★ most authoritative citation

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE - Esakal

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE Esakal

6 days ago
80 Google News Marathi Technology

Apple चा आज रात्री मोठा धमाका! पहिल्या फोल्डेबल आयफोनसह iPhone 18 Pro केला जाणार लॉन्च - News18 Marathi

Apple चा आज रात्री मोठा धमाका! पहिल्या फोल्डेबल आयफोनसह iPhone 18 Pro केला जाणार लॉन्च News18 Marathi

5 days ago
79 TV9 Marathi

iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा! - TV9 Marathi

iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा! TV9 Marathi

4 days ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app