T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 88 3 outlets citing India IN

MPSC Exam : ‘एमपीएससी’कडून गट-क २०२६ संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलली… नेमके कारण काय? - Loksatta

MPSC Exam : ‘एमपीएससी’कडून गट-क २०२६ संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलली… नेमके कारण काय? Loksatta

First reported 5 days ago · latest update 4 days ago
T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Loksatta Authority 85

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट-क २०२६ संयुक्त पूर्व परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार गट-क संयुक्त पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या तयारीत असलेल्या उमेदवारांना आता नव्या तारखेनुसार नियोजन करावे लागणार आहे.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची घोषणा केली. शासनाच्या विविध विभागांतील गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठी आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ संदर्भात १६ जुलै, २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर

प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकाद्वारे ही परीक्षा द२५ ऑक्टोबर, २०२६ रोजी प्रचलित ऑफलाइन ओएमआर पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था, परीक्षार्थीना परीक्षा केंद्रांवर वेळेत, सुरक्षितपणे पोहोचता येण्याची शक्यता तसेच परीक्षा सुरळीत, शांततापूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय बाबींचा आयोगामार्फत सर्वंकष विचार करण्यात आला आहे. काही जिल्ह्यातील परीक्षा आयोजनाबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेले अहवाल, राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२६, सणासुदींचा कालावधी, इतर भरतीसंस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक, हिवाळी अधिवेशन इत्यादी बाबींचा विचार करून महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर, २०२६ ऐवजी आता दिनांक ०३ जानेवारी, २०२७ रोजी सर्व जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेच्या तारखेतील बदलाबाबत सर्व संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. परीक्षेचे केंद्र, प्रवेशपत्र, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्रनिहाय आवश्यक सूचना तसेच इतर बाबींबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षार्थीनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना नियमितपणे पाहाव्यात, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात विभागाचे उपसचिव विवेक देशमुख यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

तिसऱ्यांदा परीक्षा लांबणीवर

आयोगाने गट क परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली आहे. या पूर्वी आयोगाने १२ जुलै, २७ सप्टेंबर, २५ ऑक्टोबर अशा तीन वेळा परीक्षा घेण्याचे जाहीर करून पुढे ढकलली आहे. २०२६च्या परीक्षेची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक असताना आता ही परीक्षा आणि पुढील प्रक्रिया २०२७मध्ये होणार आहे. त्यामुळे एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार असल्याबाबत उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचाMPSC गोपनीय कागदपत्र प्रकरण: आयोगाच्या सहसचिवांचं नाव विनाकारण गोवल्याचा पोलीस अधिकाऱ्यावर आरोप, चौकशी सुरू

विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप, निकालांबाबत निर्माण होणारे प्रश्न आणि परीक्षा प्रक्रियेतील विविध अडचणींमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी संतप्त आहेत. गेल्या काही दिवसांत पुण्यासह राज्यातील विविध भागांत विद्यार्थ्यांनी आंदोलन करत आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

↗ Read the original at Loksatta

Citations · 4 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

85 Loksatta ★ most authoritative citation

MPSC Exam : ‘एमपीएससी’कडून गट-क २०२६ संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलली… नेमके कारण काय? - Loksatta

MPSC Exam : ‘एमपीएससी’कडून गट-क २०२६ संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलली… नेमके कारण काय? Loksatta

5 days ago
84 Maharashtra Times

MPSC Exam: "आम्हाला बेरीज नको, मूल्यांकनाची फेरतपासणी हवी!"; 'एमपीएससी'चा पुन्हा शब्दांचा खेळ, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालावरून उमेदवार आक्रमक - Maharashtra Times

MPSC Exam: "आम्हाला बेरीज नको, मूल्यांकनाची फेरतपासणी हवी!"; 'एमपीएससी'चा पुन्हा शब्दांचा खेळ, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालावरून उमेदवार आक्रमक Maharashtra Times

5 days ago
84 Maharashtra Times

MPSC Exam Re-Evaluation: "एमपीएससी परीक्षांच्या पेपरची फेरतपासणी होणार अन् मुलाखती थांबवणार"; मुख्यमंत्र्यांचे परीक्षार्थींना मोठे आश्वासन! - Maharashtra Times

MPSC Exam Re-Evaluation: "एमपीएससी परीक्षांच्या पेपरची फेरतपासणी होणार अन् मुलाखती थांबवणार"; मुख्यमंत्र्यांचे परीक्षार्थींना मोठे आश्वासन! Maharashtra Times

4 days ago
79 TV9 Marathi

MPSC : एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा होणार का? फडणवीसांनी थेट सांगितलं; पेपर फेरतपासणीचाही आदेश! - TV9 Marathi

MPSC : एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा होणार का? फडणवीसांनी थेट सांगितलं; पेपर फेरतपासणीचाही आदेश! TV9 Marathi

4 days ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app