Rohit Sharma allegedly forgot his kitbag during a Ranji match, video goes viral
Marathi media reports claim that cricketer Rohit Sharma left his kitbag on a train after a Ranji Trophy game, a detail revealed by fellow player Abhishek Nayak. The story has circulated widely on social media, though no official statement from the player or team has been released.
First reported 2 days ago · latest update 2 days ago
Abhishek Nayar reveals hilarious Rohit Sharma forgetful story from Ranji days: रोहित शर्मा आणि त्याच्या विसरभोळेपणाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. रोहित शर्मा मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी जितका ओळखला जातो, तितकाच त्याच्या विसरभोळ्या आणि मजेशीर स्वभावामुळेही ओखळला जातो. मैदानावर एखादी गोष्ट विसरणं, वस्तू कुठे ठेवल्या हे आठवण्यासाठी सहकाऱ्यांना विचारणं किंवा सामन्यादरम्यान एखाद्या गमतीदार प्रसंगात हरवून जाणं, रोहितचे असे किस्से अनेकदा चर्चेत येतात. असाच रणजी ट्रॉफीमधील एक किस्सा त्याचा मित्र अभिषेक नायरने रोहित शर्माच्या शो मध्ये सांगितला आहे. रोहितचा हा किस्सा ऐकून कार्यक्रमात एकच हशा पिकला.
सर्वांचा लाडका हिटमॅन रोहित शर्माचा एक खास शो चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सोनी एन्टरटेनमेंट या चॅनेलवर येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमामधील काही शॉर्ट्स चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. रोहित शर्माच्या या शो मध्ये काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरन्स असणार आहेत. तर रोहित शर्माचे खास मित्र श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, शिखर धवन व अभिषेक नायर असणार आहेत.
यादरम्यान एका शॉर्ट व्हिडिओमध्ये रोहित शर्माचा सर्वात खास मित्र अभिषेक नायरने त्याच्या विसरभोळेपणाचा अजून एक किस्सा सांगितला आहे. अभिषेक नायरने रोहित शर्माबरोबर देशांतर्गत क्रिकेट खेळलं आहे. दोघेही मुंबई संघाकडून क्रिकेट खेळले आहेत. रोहित शर्माचा जो नवा लुक आहे, म्हणजेच रोहितने जे वजन कमी केलं आहे, त्यामध्ये अभिषेक नायरचा मोठा वाटा आहे.
हेही वाचापदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक! पाकिस्तानच्या रझाउल्लाहने इंग्लंडची उडवली झोप; ९व्या क्रमांकावर उतरत इतिहास घडवला
अभिषेक नायर या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे की, "तुम्हा सर्वांना माहितीये की रोहित शर्मा विसरभोळा आहे आणि गोष्टी विसरतो. क्रिकेटमधील त्याच्या या विसरभोळेपणाला सुरूवात कुठून झाली ते मी सांगतो. आता एक युवा खेळाडू आहे त्याची नुकतीच मुंबई रणजी ट्रॉफीसाठी संघात निवड झाली आहे. एक महत्त्वाचा सामना होता, मोठेमोठे खेळाडू होते. तेव्हा पहिल्यांदाच माझा हा प्रिय आला होता, ज्यावेळेस तो फक्त १७ वर्षांचा होता आणि त्याची रणजी संघात निवड झाली होती."
हेही वाचा“सुनील गावस्कर माझा अभिनयातील आदर्श”, नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य; कारण सांगत म्हणाले, “त्याच्या खेळातून त्याने मला…”
अभिषेक नायर किस्सा सांगताना पुढे म्हणाला, "सामन्यादिवशी सकाळीच स्टेडियममध्ये हा पोहोचला, तेही किटबॅगशिवाय. पण खरी स्टोरी इथे संपत नाही. तो तेव्हापासूनच खूप शहाणा होता. तो बॅग तर आणायला विसरला होता, पण जेव्हा त्याला विचारलं की तुझी किट बॅग कुठेय? तेव्हा हा म्हणाला, सर ट्रेनने येत होतो ना कोणाचा तरी धक्का लागला आणि किट बॅग बाहेर पडली. तितक्यात रोहित शर्मा म्हणतो, अरे ए खरी गोष्ट आहे यार ही. त्यावर अभिषेक नायर म्हणतो, ही काय कोणती स्टोरी नाही, हे खरं आहे. त्यामुळे तेव्हापासून याचं डोकं खूप धावतं. त्यावर हिटमॅन म्हणतो, अरे डोकं नाही चालत आहे भाई तेव्हा जे घडलं तेच मी सांगितलं."
हेही वाचाबाबा प्रसिद्ध क्रिकेटपटू, लेकाने 83 चित्रपटात साकारली त्यांचीच भूमिका, मराठमोळा अभिनेता म्हणाला, “ऑडिशननंतर महिन्याभराने अचानक…”
https://www.instagram.com/reel/DdLKbO7yU2S/?stkn=MW44ZndmOWl0eDAxeQ%3D%3D
रोहित शर्माच्या विसरभोळेपणाचा हा किस्सा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तर व्हिडिओमध्ये उपस्थित असलेले चाहतेही रोहित शर्माचा हा किस्सा ऐकून हसत होते.
Citations · 3 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
“ट्रेनमध्ये धक्का लागून किटबॅग पडली अन्…”, रोहित शर्मा पहिल्याच रणजी सामन्यात किटबॅग विसरला होता, अभिषेक नायरचा खुलासा; VIDEO व्हायरल - Loksatta
“ट्रेनमध्ये धक्का लागून किटबॅग पडली अन्…”, रोहित शर्मा पहिल्याच रणजी सामन्यात किटबॅग विसरला होता, अभिषेक नायरचा खुलासा; VIDEO व्हायरल Loksatta
2 days agoभारतीय तरुणाला सापडलं डोरेमॉनचं घर! ४० वर्ष जुनं आर्किटेक्चर पाहून तुमच्याही तोंडातून निघेल ‘अरे वा’! जपानमधील व्हिडीओ व्हायरल - Maharashtra Times
भारतीय तरुणाला सापडलं डोरेमॉनचं घर! ४० वर्ष जुनं आर्किटेक्चर पाहून तुमच्याही तोंडातून निघेल ‘अरे वा’! जपानमधील व्हिडीओ व्हायरल Maharashtra Times
2 days ago“ट्रेनमध्ये धक्का लागून किटबॅग पडली अन्…”, रोहित शर्मा पहिल्याच रणजी सामन्यात किटबॅग विसरला होता, अभिषेक नायरचा खुलासा; VIDEO व्हायरल - Loksatta
“ट्रेनमध्ये धक्का लागून किटबॅग पडली अन्…”, रोहित शर्मा पहिल्याच रणजी सामन्यात किटबॅग विसरला होता, अभिषेक नायरचा खुलासा; VIDEO व्हायरल Loksatta
2 days ago