दिशा सालियान प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू
दिशा सालियान प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी चारित्र्य हनन थांबवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, काही नेत्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नारायण आणि नितेश राणे हे या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
First reported 1 day ago · latest update 4 hours from nowछत्रपती संभाजीनगर : दिशा सालियन प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. यात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावांचाही समावेश आहे. या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
'आमचं फालतू चारित्र्य हनन करणं बस्स झालं. नाही तर मला कायदेशीर पावलं तथा कोणाचाही न विचार करता कठोर पावलं उचलावी लागतील', असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.प्रश्न विचारताच संताप झालाउद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांचा संताप झाला.
'आमचा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नाही. याबाबत आदित्यने आधीच खुलासा केला आहे. या प्रकरणात कुणाचंही नाव घेतलं जात आहे. उद्या तुमचंही नाव येईन. तुमचंही चारित्र्य हनन होईल. या प्रकरणात आतापर्यंत मोदी आणि ट्रम्प यांचं नाव कसं आलं नाही? याचं मला आश्चर्य वाटतं', असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.Sangli Accident : रस्त्यावर थांबलेल्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक, वडिलांसह चार वर्षीय चिमुकलीचा जागीच हृदयद्रावक अंत; आईची प्रकृती गंभीरतिला ओळखतच नाही'या प्रकरणात सातत्याने नावं घेतली जात आहेत. हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे. इतके दिवस आम्ही गप्प होतो. कारण सरकारनेच त्यावर एसआयट्या नेमल्या होत्या. त्यांना काय चौकशी करायची ती करू द्यावी म्हणून आम्ही शांत होतो. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत काहीच बोलायचं नाही, असं आम्ही ठरवलं होतं. या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. ती मुलगी जिवानिशी गेली. आम्ही तिला ओळखत नव्हतो. तिच्याशी कधी भेट झाली नाही. तिच्याशी काहीही संबंध नाही. काय घडलं त्याच्याशी आमचा संबंध नाही. तरीही आमचं नाव घेतलं जात आहे. फालतू चारित्र्य हनन बस्स झालं, नाही तर आम्हालाही कायदेशीर पावलं उचलावी लागेल', असा संतप्त इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?आदित्य ठाकरे या प्रकरणावर म्हणाले होती की, 'अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो. मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या सहा वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे', असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.Mumbai Crime : आई-बाबांच्या बेडरुममध्ये मुलाने सिक्रेट कप्पा बनवला, मुंबईतील मोलकरणीने डाव साधला, नवऱ्याच्या बाईकसाठी 10 लाख उडवले'एकदा नव्याने ही चौकशी करु द्या''कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कँपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मीडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या. परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे', असंही त्यांनी म्हटलं होतं.
Citations · 4 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Disha Salian Case : 'चारित्र्य हनन करणं बस्स करा'; दिशा सालियन प्रकरणावरुन उद्धव ठाकरे संतापले, नको नको ते बोलले - Maharashtra Times
Disha Salian Case : 'चारित्र्य हनन करणं बस्स करा'; दिशा सालियन प्रकरणावरुन उद्धव ठाकरे संतापले, नको नको ते बोलले Maharashtra Times
1 day agoDisha Salian Case:'दिशाप्रकरणात राणे पितापुत्र 'प्रत्यक्षदर्शी' साक्षीदार',ठाकरेंच्या नेत्याच्या पोस्टमुळे संशयाचे धुके गडद - Pudhari
Disha Salian Case:'दिशाप्रकरणात राणे पितापुत्र 'प्रत्यक्षदर्शी' साक्षीदार',ठाकरेंच्या नेत्याच्या पोस्टमुळे संशयाचे धुके गडद Pudhari
2 hours from nowDisha Salian Case Update: दिशा सालियान प्रकरणात नारायण अन् नितेश राणे 'प्रत्यक्षदर्शी' साक्षीदार? अखिल चित्रेंची X पोस्ट चर्चेत - Pudhari
Disha Salian Case Update: दिशा सालियान प्रकरणात नारायण अन् नितेश राणे 'प्रत्यक्षदर्शी' साक्षीदार? अखिल चित्रेंची X पोस्ट चर्चेत Pudhari
3 hours from nowDisha Salian case: दिशा सालियान प्रकरणी मोठा ट्विट? थेट प्रत्यक्षदर्शी… नेत्याची पोस्ट व्हायरल - TV9 Marathi
Disha Salian case: दिशा सालियान प्रकरणी मोठा ट्विट? थेट प्रत्यक्षदर्शी… नेत्याची पोस्ट व्हायरल TV9 Marathi
4 hours from now