Devendra Fadnavis: पेट्रोल पंपांच्या UPI शुल्क विरोधावर फडणवीसांचा पलटवार; ‘यूपीआयमुळे व्यवसाय वाढला, नाममात्र शुल्कालाही विरोध नको’ - Maharashtra Times
Devendra Fadnavis: पेट्रोल पंपांच्या UPI शुल्क विरोधावर फडणवीसांचा पलटवार; ‘यूपीआयमुळे व्यवसाय वाढला, नाममात्र शुल्कालाही विरोध नको’ Maharashtra Times
First reported 15 hours ago · latest update 5 minutes ago"यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांमुळे देशातील व्यवहार अधिक सुलभ झाले असून, व्यापार वाढविण्यासोबतच भ्रष्टाचार कमी करण्यासही त्याचा मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटची सुविधा कायम ठेवत त्याचा विस्तार करण्याची गरज आहे. यूपीआय व्यवहारांसाठी अतिशय नाममात्र शुल्क आकारण्याचा प्रस्ताव असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रस्तावाबाबत गैरसमज निर्माण केला जात आहे. यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्यासंदर्भात संसदीय समितीने यापूर्वी शिफारस केली होती, असा दावा करण्यात आला. या समितीत काँग्रेससह तत्कालीन यूपीएतील काही प्रमुख नेते सहभागी होते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचाही त्यात समावेश होता. त्यामुळे आता यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या प्रस्तावाला विरोध करताना या पूर्वीच्या शिफारसींचाही विचार करावा," असा युक्तिवाद मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला.
"प्रस्तावित शुल्क सर्व व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात लावले जाणार नसून काही विशिष्ट किंवा छोट्या व्यवहारांपुरतेच त्याचे स्वरूप असेल. त्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये अनावश्यक गैरसमज निर्माण करण्याऐवजी डिजिटल व्यवहारांच्या व्यापक फायद्यांचा विचार करण्याची गरज आहे. यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करण्याची सवय देशभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल पंपांवरही ग्राहकांकडून डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे यूपीआय सुविधा बंद करण्याऐवजी त्या माध्यमातून होणारे व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यावर भर देणे आवश्यक आहे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाच्या योजनांवरही सरकारकडून भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गालगत मालवाहतुकीसाठी स्वतंत्र डेडिकेटेड फ्रेट रेल्वे मार्ग उभारण्याचा प्रस्ताव असून, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला त्याचा डीपीआर तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. वाढवण आणि जवाहरलाल नेहरू पोर्टवरून नाशिक, जालना, सेलू, वर्धा आणि गडचिरोलीपर्यंत मालवाहतूक रेल्वे जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सावनेर परिसरात संरक्षण, न्यूक्लियर आणि एरोस्पेस क्षेत्रातील प्रकल्पांसाठी सुमारे पाच हजार एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूरच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून भरती सुरू असून, उच्च पगाराच्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे. त्याव्यतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक परिसरात चार कंपन्या सुरू झाल्या असून, देशातील मोठ्या सोलर मॉड्यूल उत्पादक कंपन्यांपैकी एक कंपनी तेथे कार्यरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. "आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?" शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण - https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.... आणखी वाचा
Citations · 3 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Devendra Fadnavis: पेट्रोल पंपांच्या UPI शुल्क विरोधावर फडणवीसांचा पलटवार; ‘यूपीआयमुळे व्यवसाय वाढला, नाममात्र शुल्कालाही विरोध नको’ - Maharashtra Times
Devendra Fadnavis: पेट्रोल पंपांच्या UPI शुल्क विरोधावर फडणवीसांचा पलटवार; ‘यूपीआयमुळे व्यवसाय वाढला, नाममात्र शुल्कालाही विरोध नको’ Maharashtra Times
15 hours agoDevendra Fadnavis on UPI Charges: UPI शुल्कावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका; व्यापारी-पेट्रोल पंपधारकांना म्हणाले, ‘विरोध करू नका’ - Pudhari
Devendra Fadnavis on UPI Charges: UPI शुल्कावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका; व्यापारी-पेट्रोल पंपधारकांना म्हणाले, ‘विरोध करू नका’ Pudhari
5 minutes agoDevendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार - TV9 Marathi
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार TV9 Marathi
15 hours ago