T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 87 3 outlets citing India IN

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाचे कडक नियम आणि विविध शहरांतील घटना

कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या असून पोलिसांकडून शिस्त पाळण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, बारामतीमध्ये अश्लील नृत्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, तर काही ठिकाणी मिरवणुकीदरम्यान गोंधळ आणि लाठीचार्जच्या घटना घडल्याचे वृत्त आहे.

First reported 2 days ago · latest update 2 hours ago
T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Sakal Authority 83

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक मंडळाच्या दोनच ट्रॅक्टर व ट्रॉलींनाच परवानगी दिली जाईल. याचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांना मिरवणूक मार्गावर प्रवेश मिळणार नाही, असे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले. मार्गावर वाहनांची संख्या कमी झाल्यास जास्तीत जास्त मंडळांना मिरवणुकीत सहभाग घेता येईल, यासाठीचा हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ताराबाई रोडवरील १४ मंडळांचे चिठ्ठीद्वारे प्रवेश क्रम निश्‍चित करण्यात आले.

जुना राजवाडा पोलिस ठाण्यात ताराबाई रोडवरील १४ मंडळांचे चिठ्ठीद्वारे प्रवेश क्रम निश्‍चित करण्यासाठी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांची होती. शहर पोलिस उपअधीक्षक पाटील यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या. यावेळी मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.

दरम्यान, चिठ्ठीद्वारे निश्‍चित झालेले मंडळांचे क्रम असे श्री. साई मित्र मंडळ, हिंदवी स्पोर्टस्‌, चौपाटी मित्र मंडळ, रंकाळा तालीम, रंकाळा टॉवर, साकोलीचा राजा गणेश भक्त मंडळ, शिवाजी तालीम मंडळ, आयरेकर गल्ली, आझाद हिंद तरुण मंडळ (दयावान ग्रुप), उत्तरेश्‍वर वाघाची तालीम, महाराष्ट्र सेवा मंडळ, कै. उमेश कांदेकर युवा मंच, भोर तालीम, पॉप्युलर स्पोर्टस्‌ क्लब-गुरुवार पेठ, रंकाळावेश तालीम मंडळ, क्रांती बॉईज.

बैठकीतील सूचना अशा मंडळांनी १० बाय १२ फुटांचेच स्ट्रक्चर जोडावे दोन बेस दोन टॉपलाच परवानगी राहणार प्रेशर मिड, लेझरला बंदीच मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, ताराबाई रोडवरील सर्व मंडळांच्या स्ट्रक्चरसह, ट्रॅक्टर ट्रॉलींची तपासणी होणार दोनपेक्षा जास्त ट्रॉली असणाऱ्या मंडळांना मिरवणुकीत प्रवेश नाकारणार यंदाच्या पहिल्या तीन मंडळांना पुढील वर्षी मिरवणुकीत शेवटी प्रवेश आज सायंकाळी पोलिस निरीक्षक लोंढे यांनी पोलिस पथकांसह विसर्जन मार्गाची पाहणी केली. मिरजकर तिकटी, बिनखांबी, पापाची तिकटी, तसेच ताराबाई रोडवर बसविण्यात येणाऱ्या ‘टायमर सिग्नल’ची ठिकाणे अंतिम करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

↗ Read the original at Sakal

Citations · 4 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

83 Sakal ★ most authoritative citation

Kolhapur Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाला दोनच ट्रॅक्टर-ट्रॉली; नियम मोडल्यास प्रवेश बंद - Esakal

Kolhapur Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाला दोनच ट्रॅक्टर-ट्रॉली; नियम मोडल्यास प्रवेश बंद Esakal

2 days ago
83 Sakal

Kolhapur Ganesh Visarjan : ‘दिग्गज’ मंडळांची दादागिरी चालणार नाही पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचा इशारा ; महाद्वार रोडवरही ‘टायमर’ आधारेच वेळा निश्चित - Esakal

Kolhapur Ganesh Visarjan : ‘दिग्गज’ मंडळांची दादागिरी चालणार नाही पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचा इशारा ; महाद्वार रोडवरही ‘टायमर’ आधारेच वेळा निश्चित Esakal

1 day ago
80 Pudhari

Baramati Ganesh Visarjan: गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य; नृत्यांगणांसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा - pudhari.news

Baramati Ganesh Visarjan: गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य; नृत्यांगणांसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा pudhari.news

2 hours ago
79 TV9 Marathi

Ganesh Visarjan 2026 : गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, पोलिसांच्या लाठीचार्जमुळे कार्यकर्त्याचा... - TV9 Marathi

Ganesh Visarjan 2026 : गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, पोलिसांच्या लाठीचार्जमुळे कार्यकर्त्याचा... TV9 Marathi

11 hours ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app