T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 98 3 outlets citing Entertainment IN

मराठी अभिनेता ओंकार भोजने यांच्यावर दिग्दर्शकांकडून अनप्रोफेशनल असल्याचा आरोप

एका सिनेमाच्या दिग्दर्शकाने अभिनेता ओंकार भोजने यांच्यावर प्रमोशनला न येणे आणि फोन न उचलल्याचा आरोप केला आहे. दिग्दर्शकाने त्यांना 'अनप्रोफेशनल' असल्याचे म्हटले असून या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

First reported 5 hours ago · latest update 4 hours ago
T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Loksatta Authority 85

मराठी मनोरंजनसृष्टीतील काही कलाकार सध्या चित्रपटांच्या प्रमोशनकडे पाठ फिरवत असल्याच्या तक्रारींनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वीच 'देवघर ऑन रेंट'च्या दिग्दर्शक-निर्मात्यांनी अभिनेता अंकित मोहन फोन उचलत नाही अशी तक्रार ट्रेलर लॉन्चदरम्यान केली होती. आता आगामी ‘अफरातफरी' सिनेमाच्या दिग्दर्शकांनी अभिनेता ओंकार भोजनेसंदर्भातही अशीच तक्रार केली आहे. ओंकारला जूनमध्ये सिनेमाची रिलीज डेट कळवली होती, सिनिअर आर्टिस्ट वेळेवर प्रमोशनला येतात. पण, नव्याने आलेले कलाकार अनप्रोफेशनल असल्याचं ‘अफरातफरी'चे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी म्हटलं आहे.

दिग्दर्शक मिलिंद कवडे 'महा MTB'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "जे प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत, ते सगळे वेळ पाळतात, वेळ देतात…आताही संजय नार्वेकर प्रमोशनला येत आहेत, ते ऑन द वे आहेत. पण, जे नवीन कलाकार आहेत…उदाहरण सांगायचं झालं तर, ओंकार भोजने. तर, ओंकारला आम्ही जूनमध्ये सांगितलं होतं की, ऑक्टोबरमध्ये सिनेमा प्रदर्शित होतोय. माझा EP, निर्माते सगळे त्याला कॉन्टॅक्ट करत आहेत, मी सुद्धा त्याला फोन केला होता. तो एवढा बिझी आहे की, तो कोणाचेही फोन उचलत नाहीये. आम्हा तिघांचेही फोन त्याने उचलले नाहीत. कॉल केल्यावर त्याचा एका टेम्प्लेट मेसेज येतो, 'दादा मी तुला कॉलबॅक करतो.' गेले चार महिने हेच सुरू आहे."

ते पुढे म्हणाले, "शेवटी, निर्मात्यांनी कंटाळून त्याला एक लेटर पाठवलंय की, बाबा रे आम्ही चित्रपट महामंडळात जाऊ का? तू को-ऑपरेटच करत नाहीयेस. अजूनही तो सांगत नाहीये, तो येणार आहे की नाही…याला एखाद्याला लटकून ठेवणं म्हणतात. बरं एका सिनेमासाठी निर्मात्याने करोडो रुपये गुंतवलेले असतात. तुम्ही निदान प्रमोशनसाठी स्वत:चा सेल्फी व्हिडीओ तरी पाठवा. आता मोहन सर ( मोहन आगाशे ) मध्यंतरी हैदराबादला होते, तिथून त्यांनी सेल्फी व्हिडीओ पाठवला होता. यालाच प्रोफेशनलपणा म्हणतात. आजही ते स्वत: प्रमोशनला आले आहेत. त्यामुळे आता मी कानाला खडा लावलाय, मी पुढच्या सिनेमात ओंकारला अजिबात घेणार नाही. मी आजवर काम खूप काम केलंय पण, या सगळ्यात तो खूप अनप्रोफेशनल अभिनेता आहे. खरंच याला अनप्रोफेशनलच म्हणतात…दिग्दर्शकाचा फोन न उचलणं, निर्मात्यांचा फोन न उचलणं, EP ला गंडवणं…सतत येतो-येतो म्हणणं. अजूनही तो म्हणतोय की, तुमच्या तारखा काय आहेत मला सांगा…अरे तू किती वेळा खोटं बोलणार? बरं ही बोंब आमचीच नाहीतर प्रत्येक निर्मात्याची आहे. तुम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट असाल तर, तुम्ही प्रमोशनला या!"

हेही वाचा‘धाकट्या सूनबाई’ मालिकेत प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची एन्ट्री! पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार, ‘असं’ आहे कथानक, वाचा…

"एक कलाकार म्हणून तो उत्तम आहे…चांगलं काम करतो. पण, माणूस म्हणून सॉरी! खूप अनप्रोफेशनल…तो सराईत खोटारडा आहे." असं सांगत मिलिंद कवडेंनी संताप व्यक्त केला आहे.

↗ Read the original at Loksatta

Citations · 3 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

85 Loksatta ★ most authoritative citation

“ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल”, प्रमोशनला येईना, फोन उचलेना; ‘या’ सिनेमाचे दिग्दर्शक भडकले, म्हणाले, “कानाला खडा लावला…” - Loksatta

“ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल”, प्रमोशनला येईना, फोन उचलेना; ‘या’ सिनेमाचे दिग्दर्शक भडकले, म्हणाले, “कानाला खडा लावला…” Loksatta

5 hours ago
83 Sakal

‘फोन उचलत नव्हता, प्रमोशनलाही आला नाही’; ओंकार भोजनेवर दिग्दर्शक भडकले, म्हणाले.... ‘खूप अनप्रोफेशनल आहे’ - Esakal

‘फोन उचलत नव्हता, प्रमोशनलाही आला नाही’; ओंकार भोजनेवर दिग्दर्शक भडकले, म्हणाले.... ‘खूप अनप्रोफेशनल आहे’ Esakal

4 hours ago
80 Google News Marathi Entertainment

“ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल”, प्रमोशनला येईना, फोन उचलेना; ‘या’ सिनेमाचे दिग्दर्शक भडकले, म्हणाले, “कानाला खडा लावला…” - Loksatta

“ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल”, प्रमोशनला येईना, फोन उचलेना; ‘या’ सिनेमाचे दिग्दर्शक भडकले, म्हणाले, “कानाला खडा लावला…” Loksatta

5 hours ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app