T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 92 3 outlets citing India IN

Asian Games 2026: सीमाने संपवला १६ वर्षांचा पदक दुष्काळ; १०,००० मीटर शर्यतीत कांस्य, रिले टीमने पटकावलं रौप्य - Loksatta

Asian Games 2026: सीमाने संपवला १६ वर्षांचा पदक दुष्काळ; १०,००० मीटर शर्यतीत कांस्य, रिले टीमने पटकावलं रौप्य Loksatta

First reported 16 hours ago · latest update 14 hours ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Loksatta Authority 85

आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी फलदायी ठरला. धावपटू सीमाने १०,००० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावलं. तब्बल १६ वर्षानंतर या स्पर्धेत या प्रकारात भारताला पदक मिळालं आहे. हिमाचल प्रदेशच्या सीमाने ५००० मीटर आणि १०००० मीटर शर्यतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सीमा अव्वल दोनमध्ये होती. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये बहरीनच्या विनफ्रेड येवीने सुवर्ण तर जपानच्या नोझोमी तानकाने रौप्यपदक पटकावलं.

मिक्स्ड रिले (४*४००मीटर) प्रकारात मनू टीएस, पोवम्मा एमआर, विशाल टीके आणि विथ्या रामराज या चौकडीने दिमाखदार कामगिरीसह रौप्यपदकाची कमाई केली. अनिमेश कुजूर आणि गुरिंदरवीर सिंग यांनी १०० मीटर प्रकारात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

अनंतजीत सिंग आणि परिनाझ धालिवाल जोडीने मिक्स्ड स्कीट प्रकारात कांस्यपदक नावावर केलं. तिहेरी उडी प्रकारात भारताच्या आशा इलंगोने चौथं स्थान राखलं. अतिशय कमी फरकाने तिची पदकाची संधी हुकली.

भारताच्या कबड्डी संघांनी आपापल्या लढती जिंकत सेमी फायनलमध्ये आगेकूच केली. महिला संघाने जपानचा ५०-२५ असा धुव्वा उडवला. सेमी फायनलमध्ये त्यांची नेपाळशी लढत आहे. हॉकी संघाने दक्षिण कोरियावर ८-२ असा दणदणीत विजय मिळवला.

जिम्नॅस्ट प्रणिती नायकला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. बॉक्सिंगपटू साक्षी चौधरीचं आव्हान राऊंड ऑफ१६ मध्ये संपुष्टात आलं. स्क्वॉशमध्ये वीर चोटरानी आणि अभय सिंग यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कॅनोई स्प्रिंट प्रकारात पार्वती गीता आणि प्रसन्न कुमार मिश्र कयाक दुहेरी ५०० मीटर प्रकारात सेमी फायनलसाठी पात्र ठरले.

↗ Read the original at Loksatta

Citations · 4 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

85 Loksatta ★ most authoritative citation

Asian Games 2026: सीमाने संपवला १६ वर्षांचा पदक दुष्काळ; १०,००० मीटर शर्यतीत कांस्य, रिले टीमने पटकावलं रौप्य - Loksatta

Asian Games 2026: सीमाने संपवला १६ वर्षांचा पदक दुष्काळ; १०,००० मीटर शर्यतीत कांस्य, रिले टीमने पटकावलं रौप्य Loksatta

14 hours ago
80 Pudhari

Asian Games 2026 : सहाव्या दिवशी भारताने किती पदके पटकावली? १६ वर्षांचा दुष्काळ संपला! - Pudhari

Asian Games 2026 : सहाव्या दिवशी भारताने किती पदके पटकावली? १६ वर्षांचा दुष्काळ संपला! Pudhari

16 hours ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026: सीमाने संपवला १६ वर्षांचा पदक दुष्काळ; १०,००० मीटर शर्यतीत कांस्य, रिले टीमने पटकावलं रौप्य - Loksatta

Asian Games 2026: सीमाने संपवला १६ वर्षांचा पदक दुष्काळ; १०,००० मीटर शर्यतीत कांस्य, रिले टीमने पटकावलं रौप्य Loksatta

14 hours ago
80 Google News Marathi Sports

Asian Games 2026 : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! तब्बल 16 वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपवला! - ABP Majha

Asian Games 2026 : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! तब्बल 16 वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपवला! ABP Majha

14 hours ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app