Pune Ganpati Visarjan 2026 : 'गुलाल उधळणारा पुण्याचा राजा' मार्गस्थ; गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ - ETV Bharat
Pune Ganpati Visarjan 2026 : 'गुलाल उधळणारा पुण्याचा राजा' मार्गस्थ; गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ ETV Bharat
First reported 14 hours ago · latest update 6 hours agoपुणे :आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या उत्साहात बाप्पाची सेवा केली. आता लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली असून, पुण्यातील मानाच्या तसंच इतर विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. आज अनंत चतुर्दशी निमित्त सकाळी 10 वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात ही विसर्जन मिरवणूक निघाली आहे.
पुण्यात 'गुलाल उधळणारा पुण्याचा राजा' अशी ओळख असलेल्या, मानाच्या तिसऱ्या श्री गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीलाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. फुलांनी अतिशय सुंदर सजवलेल्या देखण्या रथातून आणि गुलालाची भव्य उधळण करत गुरुजी तालमीच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली आहे. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण करणं, हेच या मंडळाचं मुख्य वैशिष्ट्य आहे.
स्वप्नील आणि सुभाष सरपाले या बंधूंनी हा रथ साकारला आहे. या रथासोबतच नगारावादन आणि ढोल-ताशा पथकांचं वादन देखील मोठ्या उत्साहात सुरू आहे. पुणे शहरात जवळपास साडेतीन हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशमंडळे आहेत. मात्र, पुण्यात विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळणारं हे एकमेव मानाचं मंडळ असून, या मंडळाची 'पुण्याचा राजा' अशीही ओळख आहे. विसर्जन मिरवणुकीप्रमाणेच आगमन मिरवणुकीतही मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळला जातो. आजही विसर्जन मिरवणुकीदरम्यान मंडळाकडून जागोजागी गुलालाची भव्य उधळण करण्यात येत आहे.
Citations · 3 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Pune Ganpati Visarjan 2026 : 'गुलाल उधळणारा पुण्याचा राजा' मार्गस्थ; गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ - ETV Bharat
Pune Ganpati Visarjan 2026 : 'गुलाल उधळणारा पुण्याचा राजा' मार्गस्थ; गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ ETV Bharat
9 hours agoPune Ganpati Visarjan 2026: कसबा ते केसरीवाडा... मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक कुठून निघाली आणि विसर्जन कधी झाले? संपूर्ण माहिती - Pudhari
Pune Ganpati Visarjan 2026: कसबा ते केसरीवाडा... मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक कुठून निघाली आणि विसर्जन कधी झाले? संपूर्ण माहिती Pudhari
6 hours agoPune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्… पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं... - TV9 Marathi
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्… पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं... TV9 Marathi
14 hours ago