भारतीय एथलीटों ने एशियाई खेलों 2026 में स्वर्ण पदक जीते
एशियाई खेलों 2026 में भारतीय खिलाड़ियों ने शानदार प्रदर्शन करते हुए तीरंदाजी और शूटिंग में स्वर्ण पदक हासिल किए हैं। नीरू धांडा और कायनान चेनाई ने ट्रैप मिक्स्ड इवेंट में जीत दर्ज की, जबकि तीरंदाजी में भारत ने कई स्वर्ण पदक जीते हैं।
First reported 23 hours ago · latest update 2 hours ago
ऐची-नागोया : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा (Asian Games 2026) स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप शूटिंग प्रकारात भारताची स्टार नेमबाज नीरू धांडा हिने सुवर्णपदकाला गवसणी घालत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर अत्यंत भावूक झालेल्या २६ वर्षीय नीरूने आपले हे सुवर्णपदक आई आणि प्रशिक्षकांना समर्पित केले आहे.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना नीरू म्हणाली, "हे पदक जिंकल्यानंतर जेव्हा मैदानावर आपले राष्ट्रगीत वाजले, तो क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद होता. मी हे पदक माझी आई, माझे प्रशिक्षक आणि संपूर्ण देशवासियांना समर्पित करते. जपानहून भारतात परतल्यानंतर हे पदक सर्वात आधी मला माझ्या आईच्या आणि प्रशिक्षकांच्या गळ्यात घालायचे आहे, त्यासाठी मी खूप उत्सुक आहे."
या स्पर्धेत नीरूने पात्रता फेरीत (Qualification) आणि अंतिम फेरीत (Final) दोन्ही ठिकाणी अव्वल स्थान पटकावले. अंतिम सामन्यादरम्यान सुरू असलेल्या मुसळधार पावसातही तिने कमालीचा संयम दाखवला. अंतिम फेरीच्या पहिल्याच मालिकेत तिने ५ पैकी ५ नेम तंतोतंत साधले. दुसऱ्या मालिकेत एक निशाणा चुकल्यानंतरही तिने स्वतःवरचा ताबा सुटू दिला नाही आणि उत्तम पुनरागमन करत भारतासाठी ५ वे सुवर्णपदक निश्चित केले.
स्पर्धेदरम्यान पडणाऱ्या पावसाबाबत बोलताना नीरू म्हणाली, "आम्ही दररोज सराव करताना अशा प्रतिकूल वातावरणाचा आणि खराब हवामानाचाही सामना करतो, त्यामुळे पावसात खेळणे माझ्यासाठी फारसे कठीण नव्हते. अर्थात, प्रत्येक देशातील परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे थोडे आव्हान नक्कीच होते; पण मी माझे मन शांत ठेवले, खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकले."
केतनच्या पाठीवर 'सिया' नावाचं टॅटू अन् मोबाईलमधील 'ते' फोटो! पुणे : लोणावळा येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातून आणखी एक महत्त्वाची ...
नीरू धांडाने तिच्या पहिल्याच आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. ट्रॅप शूटिंगच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला तर ठरलीच, शिवाय तिने पात्रता फेरीत ३० पैकी २८ अचूक नेम साधून नवा आशियाई विक्रमही (Asian Record) नोंदवला. विशेष म्हणजे, सामना जिंकल्यानंतर प्रसारमाध्यमांनी सांगेपर्यंत आपल्याला या ऐतिहासिक विक्रमाची कल्पनाही नव्हती, असे तिने प्रांजळपणे कबूल केले.
आपल्या या यशामागे कुटुंबाचा आणि प्रशिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे नीरू सांगते. "माझे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे. आईने माझ्या आयुष्यात खूप मोठे योगदान दिले आहे. माझी आत्या अजादो देवी या कबड्डी खेळाडू होत्या, त्यांच्याकडून मला क्रीडा क्षेत्रात येण्याची मोठी प्रेरणा मिळाली. तसेच माझे प्रशिक्षक मनशेर सिंग गेल्या ६ वर्षांपासून, अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून माझ्यासोबत कठोर मेहनत घेत आहेत," अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
नीरूने तिच्या संपूर्ण सपोर्ट टीमचे मनःपूर्वक आभार मानले. "आमचे प्रशिक्षक आणि ऑलिम्पिक विजेते पीटर विल्सन, विक्रम सर, फिजियो अश्विनी मॅम, मानसोपचारतज्ज्ञ टी. जे. सर आणि माझे सर्व सहकारी खेळाडू या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले आहे," असे ती म्हणाली.
नीरू धांडासाठी हे वर्ष यशाचे ठरले आहे. याआधी जुलै महिन्यात इटलीतील लोनाटो येथे झालेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत तिने महिला ट्रॅप प्रकारात आपले पहिले सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय तिने आशियाई चॅम्पियनशिपचे विजेतेपदही पटकावले आहे. नीरू भारतीय सैन्याच्या 'मार्कसमनशिप युनिट'मध्ये नायब सुभेदार म्हणून कार्यरत आहे.
वैयक्तिक सुवर्णपदकाव्यतिरिक्त नीरू धांडाने आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या साथीने महिला ट्रॅप संघ प्रकारात भारताला रौप्यपदक (Silver Medal) मिळवून दिले. भारतीय संघाने ३२८ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर चीनने ३४६ गुणांसह सुवर्ण आणि कुवेतने ३२५ गुणांसह कांस्यपदक जिंकले. संघ प्रकारातही नीरूने १२५ पैकी ११८ गुण मिळवत भारतीय संघात सर्वोत्तम कामगिरी केली.
Citations · 5 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Asian Games 2026 : हे सुवर्णपदक मला माझ्या आईच्या गळ्यात घालायचे आहे! : आशियाई स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या नीरू धांडाची भावूक प्रतिक्रिया - Prahaar.in
Asian Games 2026 : हे सुवर्णपदक मला माझ्या आईच्या गळ्यात घालायचे आहे! : आशियाई स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या नीरू धांडाची भावूक प्रतिक्रिया Prahaar.in
23 hours agoAsian Games 2026: भारताच्या लेकींचा 'अचूक निशाणा' अन् चीनचा पराभव! तिरंदाजीत पटकावले सुवर्णपदक - Pudhari
Asian Games 2026: भारताच्या लेकींचा 'अचूक निशाणा' अन् चीनचा पराभव! तिरंदाजीत पटकावले सुवर्णपदक Pudhari
6 hours agoAsian Games 2026: भारताच्या लेकींचा 'अचूक निशाणा' अन् चीनचा पराभव! तिरंदाजीत पटकावले सुवर्णपदक - Pudhari
Asian Games 2026: भारताच्या लेकींचा 'अचूक निशाणा' अन् चीनचा पराभव! तिरंदाजीत पटकावले सुवर्णपदक Pudhari
6 hours agoAsian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरू धांडाची पुन्हा कमाल; कायनान चेनाईसोबत ट्रॅप मिक्स्डमध्ये सुवर्णपदक - Prahaar.in
Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरू धांडाची पुन्हा कमाल; कायनान चेनाईसोबत ट्रॅप मिक्स्डमध्ये सुवर्णपदक Prahaar.in
2 hours agoAsian Games 2026: तिरंदाजीत भारताची गोल्डन हॅटट्रिक! दिवसभरात जिंकलं चौथं सुवर्णपदक - ETV Bharat
Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची गोल्डन हॅटट्रिक! दिवसभरात जिंकलं चौथं सुवर्णपदक ETV Bharat
2 hours ago