Drishyam 3 Collection: 'दृश्यम ३' ने मोडला 'तान्हाजी'चा रेकॉर्ड, अजय देवगणच्या सिनेमाची ११ दिवसांत तब्बल इतक्या कोटींची कमाई - Maharashtra Times
Drishyam 3 Collection: 'दृश्यम ३' ने मोडला 'तान्हाजी'चा रेकॉर्ड, अजय देवगणच्या सिनेमाची ११ दिवसांत तब्बल इतक्या कोटींची कमाई Maharashtra Times
First reported 1 week ago · latest update 4 hours ago'दृश्यम ३' नं रिलीजच्या १० व्या दिवशीच भारतात ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला होता. दुसऱ्या विकेंडला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळं चित्रपटाच्या कमाईला मोठी गती मिळाली.ट्रेड ट्रॅकर Sacnilk च्या आकडेवारीनुसार, ११ व्या दिवशी चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे ६.२५ कोटी रुपये (नेट) गल्ला जमवला. यासह चित्रपटाचं भारतातील एकूण नेट कलेक्शन ३१५.२५ कोटी रुपये तर ग्रॉस कलेक्शन ३७८.२४ कोटी रुपये झालं आहे.
या कामगिरीमुळं 'दृश्यम ३' हा अजय देवगणच्या करिअरमधील सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं अजय देवगणच्याच 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' (ज्याची एकूण कमाई ३६७.६५ कोटी रुपये होती) या चित्रपटाचा लाईफटाईम रेकॉर्ड मोडून काढला आहे. तसंच, भारतात ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नेट कमाई करणारा हा अजय देवगणचा मुख्य भूमिकेतील पहिलाच चित्रपट ठरला आहे.
विजय साळगांवकरच्या या कथेनं प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तर चित्रपटाची कथा 'दृश्यम २'च्या पुढील घडामोडींवर आधारित आहे. तबूनं साकारलेली मीरा आपल्या मुलाला (सॅम) न्याय मिळवून देण्यासाठी आणि विजय साळगांवकरचा (अजय देवगण) पर्दाफाश करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरते. यावेळच्या भागात पोलिसांच्या बाजूने जयदीप अहलावत (राजवीर सिंह तोमर) याची दमदार एंट्री झाली आहे. विजय साळगावकर आणि राजवीर सिंह तोमर यांच्यातील बुद्धिमत्तेची आणि माईंड गेम्सची लढाई या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. कुटुंबाच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाणारा विजय आणि त्याला पकडण्यासाठी कटिबद्ध असलेला तोमर यांच्यातील प्रसंग प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.
परदेशात या चित्रपटानं तब्बल १०९ कोटी रुपयांचा ग्रॉस गल्ला जमवला आहे. त्यामुळं चित्रपटाचे वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन४८७.२४ कोटी रुपयांवर पोहोचलं असून, ५०० कोटींच्या ऐतिहासिक टप्प्यापासून चित्रपट आता अवघा १२ ते १३ कोटी रुपये दूर आहे.
Sushma Jaywant On Negative Comments : अकाउंटवर देवांचे फोटो अन् महिलांच्या व्हिडिओवर घाणेरड्या कमेंट, कमळी फेम अभिनेत्रीसोबत संतापजनक प्रकार, दाखवले स्क्रीनशॉर्ट्स अभिषेक पाठक दिग्दर्शित या क्राइम थ्रिलर फ्रँचायझीच्या अंतिम भागात अजय देवगणसोबतच तबू, श्रिया सरन, इशिता दत्ता, जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. नवीन चित्रपट रिलीज होऊनही 'दृश्यम ३' चे थिएटर्समधील प्रदर्शन मजबूत असून, येत्या काही दिवसांत हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा सहजरीत्या पार करेल असा विश्वास चित्रपट विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
Citations · 12 reports from 3 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Drishyam 3 Collection: 'दृश्यम ३' ने मोडला 'तान्हाजी'चा रेकॉर्ड, अजय देवगणच्या सिनेमाची ११ दिवसांत तब्बल इतक्या कोटींची कमाई - Maharashtra Times
Drishyam 3 Collection: 'दृश्यम ३' ने मोडला 'तान्हाजी'चा रेकॉर्ड, अजय देवगणच्या सिनेमाची ११ दिवसांत तब्बल इतक्या कोटींची कमाई Maharashtra Times
4 hours agoDrishyam 3 Box Office Collection: दृश्यम 3 रिलीज आधीच सुस्साट, बॉक्स ऑफिसवर वादळ उठणार, अजय देवगणचा - ABP Majha
Drishyam 3 Box Office Collection: दृश्यम 3 रिलीज आधीच सुस्साट, बॉक्स ऑफिसवर वादळ उठणार, अजय देवगणचा ABP Majha
1 week agoDrishyam 3 Box Office collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’नं बॉक्स ऑफिस हादरवलं! पहिल्याच दिवशी छप्परफाड - ABP Majha
Drishyam 3 Box Office collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’नं बॉक्स ऑफिस हादरवलं! पहिल्याच दिवशी छप्परफाड ABP Majha
1 week agoDrishyam 3 नं बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, अजय देवगणच्या सिनेमाची पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई, कमावले इतके... - TV9 Marathi
Drishyam 3 नं बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, अजय देवगणच्या सिनेमाची पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई, कमावले इतके... TV9 Marathi
1 week agoDrishyam 3 Box Office: बॉक्स ऑफिसवर दृश्यम ३चा धुमाकूळ! दोन दिवसांत तुफान कमाई, अजय बनवणार नवीन... - tv9marathi.com
Drishyam 3 Box Office: बॉक्स ऑफिसवर दृश्यम ३चा धुमाकूळ! दोन दिवसांत तुफान कमाई, अजय बनवणार नवीन... tv9marathi.com
1 week agoDrishyam 3 Box Office Collection: दृश्यम 3 पाहून प्रेक्षकांचे डोकं चक्रावलं रविवारी बॉक्स ऑफिसवर - ABP Majha
Drishyam 3 Box Office Collection: दृश्यम 3 पाहून प्रेक्षकांचे डोकं चक्रावलं रविवारी बॉक्स ऑफिसवर ABP Majha
1 week agoDrishyam 3 Box Office : दृश्यम 3 अजय देवगणच्या करिअरसाठी ठरला लकी! 35 वर्षांत न झालेली कमाई 3 दिवसांत निघाली भरुन, रविवारी किती कमावले? - Maharashtra Times
Drishyam 3 Box Office : दृश्यम 3 अजय देवगणच्या करिअरसाठी ठरला लकी! 35 वर्षांत न झालेली कमाई 3 दिवसांत निघाली भरुन, रविवारी किती कमावले? Maharashtra Times
1 week agoDrishyam 3 Box Office : अजय देवगणच्या सिनेमाचा जलवा कायम, कमाई २०० कोटींच्या उंबरठ्यावर! - Asianet News Marathi
Drishyam 3 Box Office : अजय देवगणच्या सिनेमाचा जलवा कायम, कमाई २०० कोटींच्या उंबरठ्यावर! Asianet News Marathi
1 week agoDrishyam 3 Box Office Collection Day 5: दृश्यम 3ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला - ABP Majha
Drishyam 3 Box Office Collection Day 5: दृश्यम 3ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला ABP Majha
6 days agoDrishyam 3 Box Office Collection : अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; 5 दिवसांत कमावले तब्बल 216 कोटी - Prahaar.in
Drishyam 3 Box Office Collection : अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; 5 दिवसांत कमावले तब्बल 216 कोटी Prahaar.in
6 days agoDrishyam 3 Box Office : अजय देवगणच्या 'दृश्यम 3' ची जगभरात 400 कोटींच्या पार झेप - Asianet News Marathi
Drishyam 3 Box Office : अजय देवगणच्या 'दृश्यम 3' ची जगभरात 400 कोटींच्या पार झेप Asianet News Marathi
3 days agoDrishyam 3 Box Office: बॉक्स ऑफिसवर दृश्यम ३चा धुमाकूळ! दोन दिवसांत तुफान कमाई, अजय बनवणार नवीन... - tv9marathi.com
Drishyam 3 Box Office: बॉक्स ऑफिसवर दृश्यम ३चा धुमाकूळ! दोन दिवसांत तुफान कमाई, अजय बनवणार नवीन... tv9marathi.com
1 week ago