T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 87 3 outlets citing Entertainment IN

Drishyam 3 Box Office : वीकेंड गाजवल्यानंतर सोमवार बॉक्स ऑफिस परीक्षेत दृश्यम 3 पास की नापास? वाचा चौथ्या दिवशीची कमाई - Maharashtra Times

Drishyam 3 Box Office : वीकेंड गाजवल्यानंतर सोमवार बॉक्स ऑफिस परीक्षेत दृश्यम 3 पास की नापास? वाचा चौथ्या दिवशीची कमाई Maharashtra Times

First reported 3 days ago · latest update 2 hours ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Maharashtra Times Authority 84

अजय देवगण आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला 'दृश्यम 3: द कन्क्लुजन' हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. अभिषेक पाठक दिग्दर्शित हा चित्रपट अत्यंत उत्कंठावर्धक आणि बुद्धीला चालना देणारा आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या चित्रपटाची कथा 'दृश्यम 2' जिथे संपली होती, तिथूनच पुढे सुरू होते आणि विजय साळगावकर (अजय देवगण) व पोलीस यांच्यातील 'चोर-पोलिस'चा खेळ पुन्हा एकदा रंगतो.कथेची सुरुवात माजी आयजी मीरा देशमुख (तब्बू) यांच्यापासून होते; मुलगा समीर याच्या निधनानंतर त्या अत्यंत नैराश्येत जातात. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केलेला असतो. त्यांची खालावलेली प्रकृती पाहून पती महेश देशमुख (रजत कपूर) हे प्रकरण पुन्हा उघडण्याचा आग्रह धरतात. यातूनच क्राईम ब्रँचचे एसपी राजवीर सिंग तोमर यांची भूमिका साकारणाऱ्या जयदीप अहलावत यांचा चित्रपटात प्रवेश होतो.यावेळी विजयसाठी परिस्थिती अत्यंत कठीण आहे, त्यापाठी दोन प्रमुख कारणे आहेत. पोलिसांच्या हाती त्याच्याविरुद्ध नवीन पुरावे लागले आहेत आणि त्यांना वकील इंद्रजित शेट्टी (प्रकाश राज) यांची साथ मिळाली आहे. इंद्रजित शेट्टी हे कायद्याच्या क्षेत्रातील असे दिग्गज आहेत ज्यांनी आजवर एकही खटला हरलेला नसतो.Yogini Chouk Twins : जुळ्यांचा जन्म, मुलगा जगेल की नाही अशी भीती,सासूबाईंनी देवही ठेवलेले पाण्यात, स्वत:च शिक्षण आलं कामी,योगिनी चौकने सांगितला कठीण प्रसंगयावेळी प्रश्न असा आहे की, 23 जुलै रोजी नक्की काय घडले होते?'दृश्यम 3' ची कथा एका आणखी एका महत्त्वपूर्ण तारखेभोवती फिरते ते म्हणजे 23 जुलैला काय घडले, हाच यातील मुख्य प्रश्न आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट मोहनलाल यांची भूमिका असलेल्या मल्याळम चित्रपट मालिकेचा रिमेक असला, तरी त्याची हिंदी व्हर्जन मूळ कथेपेक्षा वेगळी आहे. विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही कथा टप्प्याटप्प्याने उलगडत जाते आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवते; अखेरीस ती एकाच मुख्य प्रश्नाकडे वळते – विजय साळगावकरला यावेली ही पोलिसांना चकवा देण्यात यश मिळेल का? की तो यावेळी पुरव्यांनिशी पोलिसांना सापडेल?'दृश्यम 3' ने पहिल्या सोमवारी किती कमाई केली?या चित्रपटाने चौथ्या दिवशीही दमदार कमाई केली आहे.

'सॅकनिल्क' च्या अहवालानुसार 16,274 शोजमधून या चित्रपटाने 21 कोटी रुपयांची कमाई केली. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण 197.50 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. त्याचबरोबर, परदेशातील थिएटरमधून 5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटाने आतापर्यंत 303 कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे.Baseer Ali Breakup : प्रेमासाठी गर्लफ्रेंड धर्मांतरास तयार, तरी अभिनेत्याने केलं ब्रेकअप; म्हणाला- नियम पाळले नसते तर पाप माझ्या माथी होतं'दृश्यम 3' ने 'बॉर्डर 2' ला मागे टाकलेअजय देवगणच्या 'दृश्यम 3' ने या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर 2' ला मागे टाकले आहे.

'बॉर्डर 2' ने चार दिवसांत 180 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर 'दृश्यम 3' ने आधीच 197.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.जयदीप अहलावत आणि रजत कपूर यांच्यासारखे कलाकार'दृश्यम 3: द कन्क्लुजन' मध्ये इशिता दत्ताने मुख्य पात्र विजय साळगावकर यांची मोठी मुलगी 'अंजू साळगावकर'ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, त्याने रिलीजच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक कमाईची नोंद केली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण (विजय साळगावकर), तब्बू (मीरा देशमुख), श्रिया सरन (नंदिनी), जयदीप अहलावत (राजवीर सिंग तोमर), कमलेश सावंत (गायतोंडे) आणि रजत कपूर यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.'दृश्यम' फ्रँचायझीचा तिसरा आणि अंतिम भागहा चित्रपट 'दृश्यम' फ्रँचायझीचा तिसरा आणि अंतिम भाग आहे असे म्हटले जाते. त्यात विजय साळगावकर यांचे कुटुंब आणि पोलीस यांच्यातील माइंड गेम्स संपवणार आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध राजवीर आणि विजय साळगावकर यांच्यातील संघर्षावर केंद्रित आहे, तर उत्तरार्ध एका उत्तम क्लायमॅक्सकडे नेणाऱ्या कोर्टरूम ड्रामामध्ये बदलतो.

↗ Read the original at Maharashtra Times

Citations · 7 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

84 Maharashtra Times ★ most authoritative citation

Drishyam 3 Box Office : वीकेंड गाजवल्यानंतर सोमवार बॉक्स ऑफिस परीक्षेत दृश्यम 3 पास की नापास? वाचा चौथ्या दिवशीची कमाई - Maharashtra Times

Drishyam 3 Box Office : वीकेंड गाजवल्यानंतर सोमवार बॉक्स ऑफिस परीक्षेत दृश्यम 3 पास की नापास? वाचा चौथ्या दिवशीची कमाई Maharashtra Times

2 hours ago
80 Google News Marathi Entertainment

Drishyam 3 box office: पहिल्याच दिवशी ‘दृश्यम ३’ने रचला इतिहास! काय आहे सिनेमाची कथा? वाचा - TV9 Marathi

Drishyam 3 box office: पहिल्याच दिवशी ‘दृश्यम ३’ने रचला इतिहास! काय आहे सिनेमाची कथा? वाचा TV9 Marathi

3 days ago
80 Google News Marathi Entertainment

Drishyam 3 Box Office: दृश्यम ३ ची बंपर कमाई, पहिल्याच दिवशी गल्ला ९५ कोटींच्या पार - Asianet News Marathi

Drishyam 3 Box Office: दृश्यम ३ ची बंपर कमाई, पहिल्याच दिवशी गल्ला ९५ कोटींच्या पार Asianet News Marathi

2 days ago
80 Google News Marathi Entertainment

Drishyam 3 Box Office : दृश्यम 3 ने मोडला KGF 2 आणि गदर 2 चा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, पण पहिल्या क्रमांकासाठी चॅलेंज देतायत 2 सिनेमे - Maharashtra Times

Drishyam 3 Box Office : दृश्यम 3 ने मोडला KGF 2 आणि गदर 2 चा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, पण पहिल्या क्रमांकासाठी चॅलेंज देतायत 2 सिनेमे Maharashtra Times

1 day ago
80 Google News Marathi Entertainment

Drishyam 3 Box Office : 'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर हवा; दोन दिवसांत 100 कोटी पार - Asianet News Marathi

Drishyam 3 Box Office : 'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर हवा; दोन दिवसांत 100 कोटी पार Asianet News Marathi

1 day ago
79 TV9 Marathi

Drishyam 3 box office: पहिल्याच दिवशी ‘दृश्यम ३’ने रचला इतिहास! काय आहे सिनेमाची कथा? वाचा - TV9 Marathi

Drishyam 3 box office: पहिल्याच दिवशी ‘दृश्यम ३’ने रचला इतिहास! काय आहे सिनेमाची कथा? वाचा TV9 Marathi

3 days ago
79 TV9 Marathi

Drishyam 3 box office collection: विजय साळगावकरचा स्वॅग! ‘दृश्यम ३’ने तीन दिवसांत कमावले... - TV9 Marathi

Drishyam 3 box office collection: विजय साळगावकरचा स्वॅग! ‘दृश्यम ३’ने तीन दिवसांत कमावले... TV9 Marathi

1 day ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app