T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 80 3 outlets citing India IN

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण - Saam Tv

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण Saam Tv

First reported 2 days ago · latest update 1 day ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Sakal Authority 83

संजय दत्तने भारतातील शांततेवर केलं होतं मोठं विधान

भारतात पूर्वीसारखी शांतता नाही असं म्हणाला होता संजय दत्त

संजय दत्त वक्तव्यानंतर झाला होता ट्रोल

ट्रोलिंगनंतर संजय दत्तने स्पष्टीकरण दिलं

माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला असल्याचे त्याने सांगितले

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. भारतामध्ये आता पहिल्यासारखी शांतता राहिली नाही, असं विधान त्याने केले होते. त्याच्या या विधानानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. संजय दत्त गांधी जयंतीच्या दिवशी शेखर सुमन यांच्या 'शेखर टुनाईट' या शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याने देशातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. यावर बोलताना त्याने 'मला भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही.', असे विधान केले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर आता संजय दत्तने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला, असे मत संजय दत्तने व्यक्त केले.

संजय दत्तने आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने म्हटले आहे की, तो जे काही बोलला ते गांधीगिरीच्या भावनेतून होते आणि ते पूर्वनियोजित होते. त्याने आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. संजय दत्तची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

संजय दत्तने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्याने स्पष्ट केले आहे की, शोमध्ये तो जे काही बोलला ते सर्व स्क्रिप्टचा भाग होता. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मला हे स्पष्ट करायचे आहे की, कोणत्याही व्यक्ती, समुदाय किंवा संस्थेच्या भावना दुखावण्याचा त्यांचा अपमान करण्याचा किंवा त्यांचा अनादर करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. मी जे काही बोललो ते सर्व पूर्वनियोजित होते. त्या चर्चेचा उद्देश केवळ एक हलकेफुलके आणि विनोदी वातावरण निर्माण करणे हा होता.'

मैं यह स्पष्ट करना चाहता हूँ कि किसी भी व्यक्ति, समुदाय या संस्था की भावनाओं को ठेस पहुँचाना, उनका अपमान करना या उनका अनादर करना मेरा उद्देश्य कभी नहीं रहा है।

मेरी टिप्पणियाँ एक स्क्रिप्टेड बातचीत के संदर्भ में की गई थीं, जिसका उद्देश्य हल्का-फुल्का और हास्यपूर्ण संवाद करना था।…

संजय दत्तने पोस्टमध्ये पुढे असेही सांगितले की, 'मी जे बोललो त्यामागील भावना 'मुन्नाभाई'सारख्या चित्रपटांमधील विनोद आणि उपहासासारखी होती. विशेषतः 'गांधगिरी'ची संकल्पना, ज्याचा उद्देश प्रेम, आपलेपणा, एकता आणि सदिच्छा यांचा संदेश देणे होता. दुर्दैवाने माझ्या शब्दांचा वेगळा अर्थ लावला गेला. त्यांचा संदर्भाबाहेर अर्थ लावला गेला.', असे म्हणत संजय दत्तने खंत व्यक्त केली.

शोदरम्यान संजय दत्तला देशाच्या पंतप्रधानांची भूमिका साकारून ५ मिनिटे लोकांना संबोधित करण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी त्याने 'मुन्नाभाई'च्या शैलीत एक उपरोधिक भाषण दिले आणि म्हणाला, 'या देशात खूप चांगले लोक आहेत. इथे शांतता नांदायला हवी. मला आता माझ्या देशात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही. आम्ही भारतीय खूप मोठ्या मनाचे आणि पाहुणचार करणारे आहोत. आम्ही खूप काही दिले आहे आणि आम्ही नेहमी तसेच राहिले पाहिजे. मी भगवान शिवाला प्रार्थना करतो की ते दिवस पुन्हा परत यावेत.'

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

↗ Read the original at Sakal

Citations · 3 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

83 Sakal ★ most authoritative citation

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण - Saam Tv

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण Saam Tv

1 day ago
80 Google News Marathi Entertainment

Sanjay Dutt : संजय दत्तच्या शांततेच्या वक्तव्यावरून वाद ! आता स्पष्टीकरण, म्हणाला- भावना दुखावण्याचा हेतू नव्हता - Prahaar.in

Sanjay Dutt : संजय दत्तच्या शांततेच्या वक्तव्यावरून वाद ! आता स्पष्टीकरण, म्हणाला- भावना दुखावण्याचा हेतू नव्हता Prahaar.in

1 day ago
79 TV9 Marathi

Sanjay Dutt : इथे सिगारेट… संजय दत्तनं सांगितला तुरुंगातील थक्क करणारा अनुभव - TV9 Marathi

Sanjay Dutt : इथे सिगारेट… संजय दत्तनं सांगितला तुरुंगातील थक्क करणारा अनुभव TV9 Marathi

2 days ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app