T.A.M · The Air Media
← Back to live feed
Weightage 88 3 outlets citing Sports IN

Virat Kohli addresses claims regarding meeting with Premanand Maharaj

Virat Kohli has responded to claims circulating in media reports that he allegedly paid 5 crore rupees to visit Premanand Maharaj's ashram. The reports highlight public discussion and confusion surrounding the origin of these financial claims.

First reported 1 day ago · latest update 1 hour ago
✦ T.A.M verified this synthesis across 3 independent outlets. The headline and summary are written neutrally from all citations below.
Maharashtra Times Authority 84

दिनेश शर्मा यांनी केलेले आरोप हे निराधार, पूर्णपणे खोटे आणि वस्तुस्थितीच्या विरुद्ध असल्याचे विराटच्या टीमने स्पष्ट केले आहे. विराटच्या प्रवक्त्याने सांगितलं की, विराट हा नेहमी प्रेमानंद महाराजांना त्यांच्यावरील श्रद्धा आणि भक्ती पोटी भेटत असतो. तसेच कोहलीला आश्रमात जाण्यासाठी पाच कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा हा पूर्णपणे चुकीचा असल्याचंही त्याच्या टीमने स्पष्ट केलं आहे. सोबतच विराटच्या टीमकडून प्रसारमाध्यमांना देखील अशा प्रकारचे दावे प्रसिद्ध करण्याअगोदर त्यांची योग्य पडताळणी करावी असा असं देखील सांगण्यात आलं आहे.

Bhuvneshwar Kumar : वशिला नाही टॅलेंट! स्विंगचा बादशाह भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात 4 वर्षांनी कसे झाले कमबॅक? आरसीबी ठरला 'सेतू' दरम्यान, एका टीव्ही चॅनलच्या रिपोर्ट मध्ये फलाहारी महाराज म्हणून ओळखले जाणारे आणि श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश शर्मा यांच्या हवाल्याने हा खळबळजनक दावा केला होता. राजस्थान मधील एका प्रॉपर्टी डेव्हलपर लॉबी आणि एका खाजगी कंपनीने विराट कोहलीला प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये दिले असल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. तर आता विराटने पत्नी अनुष्का सोबत जानेवारी २०२३ मध्ये पहिल्यांदा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिली होती. त्यानंतर दोघे अनेकदा आश्रमात त्यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र त्या भेटी मागे पैसे घेतल्याचा आरोप झाल्यानंतर विराटच्या टीमने स्पष्ट शब्दात हा दावा फेटाळून लावला आहे आणि या चर्चांना पूर्णविराम लावले आहे.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. पत्रकारितेमधील अनुभव पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना 'थोडक्यात' या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील 'श्रीराम समर्थ' या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK) 'थोडक्यात' नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर 'पोलीसनामा'मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत. शैक्षणिक पात्रता हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.... आणखी वाचा

↗ Read the original at Maharashtra Times

Citations · 4 reports from 3 outlets

Tap a citation to read it above, right here on T.A.M.

84 Maharashtra Times ★ most authoritative citation

Virat Kohli : वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांकडे जाण्यासाठी विराटने खरंच 5 कोटी घेतले का? किंग कोहलीकडून मोठा खुलासा, काय म्हणाला? - Maharashtra Times

Virat Kohli : वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांकडे जाण्यासाठी विराटने खरंच 5 कोटी घेतले का? किंग कोहलीकडून मोठा खुलासा, काय म्हणाला? Maharashtra Times

1 hour ago
80 Google News Marathi Sports

Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला... फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या - ABP Majha

Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला... फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या ABP Majha

1 day ago
80 Google News Marathi Sports

Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा - ABP Majha

Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा ABP Majha

2 hours ago
79 TV9 Marathi

Virat Kohli: 5 कोटींच्या दाव्याने खळबळ, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील भेटीवर विराट कोहलीचा मोठा खुलासा - TV9 Marathi

Virat Kohli: 5 कोटींच्या दाव्याने खळबळ, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील भेटीवर विराट कोहलीचा मोठा खुलासा TV9 Marathi

2 hours ago

Discussion

Read it on the T.A.M app Weighted news · citations · ad-free
Get the app