Nana Patekar Passes Away : 'या' अभिनेत्रीमुळेच नाना पाटेकर यांचा सिनेसृष्टीत झाला प्रवेश, मुलाखतीत सांगितलेला किस्सा - Esakal
Nana Patekar Passes Away : 'या' अभिनेत्रीमुळेच नाना पाटेकर यांचा सिनेसृष्टीत झाला प्रवेश, मुलाखतीत सांगितलेला किस्सा Esakal
First reported 4 hours ago · latest update 3 hours ago
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने भारतीय सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना त्यांच्या गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. आपल्या प्रभावी अभिनयाने, दमदार संवादफेकीने आणि वेगळ्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या नानांच्या जाण्याने सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे..भुकेच्या दिवसांतून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवातविश्वनाथ पाटेकर म्हणजेच नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या नानांचे वडील कापड व्यवसायात होते, तर आई गृहिणी होत्या. लहानपणी आपल्या सावळ्या रंगामुळे त्यांना न्यूनगंडाचा सामना करावा लागला. याच काळात, तिसरीत असतानाच त्यांनी गावातील नाटकांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. वडिलांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची इच्छा त्यांच्या अभिनयाच्या सुरुवातीमागे होती.मात्र नववीत असताना त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. १९६४ मध्ये वडिलांच्या व्यवसायातील भागीदाराने फसवणूक केल्याने कुटुंबाची संपत्ती आणि घर गेले. आर्थिक परिस्थिती ढासळल्यानंतर कुटुंबाला मुंबईत स्थलांतर करावे लागले. अवघ्या १३व्या वर्षी नानांवर कुटुंबाची जबाबदारी आली..शाळेनंतर ते दररोज आठ किलोमीटर चालत चूनाभट्टीला जात आणि चित्रपटांची पोस्टर्स रंगवत. या कामासाठी त्यांना महिन्याला केवळ ३५ रुपये मिळत. त्यासोबत दिवसातून एकच जेवण मिळत असे. भुकेच्या दिवसांत मित्रांच्या घरी जाऊन “कसे आहात?” अशी विचारपूस करत, एखादा चपातीचा तुकडा मिळेल या आशेने ते तिथे जात असत. त्यांनी नंतर आपल्या त्या काळातील आठवणी सांगताना भाकरीच्या सुगंधाची तुलना फुलांच्या सुगंधाशी केली होती.रंगभूमीने घडवला अभिनेताआर्थिक संघर्ष सुरू असतानाही नानांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्समधून डिप्लोमा पूर्ण केला. पुढे जाहिरात एजन्सीत नोकरी करत त्यांनी नाटकांमध्येही काम सुरू ठेवले. रंगभूमीवर काम करताना संवादफेक, देहबोली आणि व्यक्तिरेखा साकारण्याची बारकाई त्यांनी आत्मसात केली. अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी त्यांची मैत्री झाली आणि त्यातून त्यांच्या चित्रपटप्रवासालाही नवी दिशा मिळाली..Nana Patekar Bollywood Entry: स्मिता पाटील यांच्यामुळे नाना पाटेकरांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'त्या' शब्दांची नानांना आजही आठवण, म्हणाले....‘गमन’पासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत१९७८ मध्ये ‘गमन’मधून नानांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात मात्र त्यांना सहज यश मिळाले नाही. त्यांचे अपारंपरिक व्यक्तिमत्त्व आणि तीव्र अभिनयशैली पाहता अनेक दिग्दर्शकांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे त्यांनी छोट्या भूमिका स्वीकारत आपला प्रवास सुरू ठेवला. ‘गमन’, ‘सिंहासन’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांची दखल घेतली जाऊ लागली.दरम्यान, नाना अवघे २८ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे तणावामुळे हृदयविकाराने निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतरही त्यांना नाटक पूर्ण करण्यासाठी जावे लागले. कारण त्या काळात काम थांबवणे म्हणजे उदरनिर्वाहाचा आधार गमावणे होते.‘परिंदा’ने त्यांच्या कारकिर्दीला मोठी ओळख मिळवून दिली. १९८९च्या या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘क्रांतीवीर’, ‘अंगार’ आणि ‘प्रहार’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली. ‘क्रांतीवीर’मधील प्रताप नारायण तिलक ही व्यक्तिरेखा विशेष गाजली..अभिनयासोबत दिग्दर्शन आणि सामाजिक कामनाना केवळ अभिनेता म्हणूनच थांबले नाहीत. ‘प्रहार’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनातही पाऊल ठेवले. संवेदनशील आणि सामाजिक विषयांवर काम करण्याची त्यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीत दिसून आली.पुढे साधे जीवन जगताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून मदतीचे काम केले. मात्र त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा केंद्रबिंदू राहिला तो संघर्ष, मेहनत, स्वाभिमान आणि जिद्द. भुकेच्या दिवसांपासून राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार होण्यापर्यंतचा नानांचा प्रवास रंगभूमीपासून सुरू होऊन भारतीय चित्रपटसृष्टीतील एका प्रभावी आणि अष्टपैलू अभिनेत्यापर्यंत पोहोचला..Nana Patekar Death: सिनेसृसृष्टीला मोठा धक्का! अभिनेते नाना पाटेकर यांचं अकस्मात निधन; चाहत्यांना कानावर विश्वास बसेना .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News.
Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Citations · 6 reports from 4 outlets
Tap a citation to read it above, right here on T.A.M.
Nana Patekar Passes Away: मित्रांच्या घरी भाकरी मागितली, वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतरही नाटक केलं; नानांचा संघर्ष थक्क करेल - Esakal
Nana Patekar Passes Away: मित्रांच्या घरी भाकरी मागितली, वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतरही नाटक केलं; नानांचा संघर्ष थक्क करेल Esakal
3 hours agoNana Patekar Passes Away : 'या' अभिनेत्रीमुळेच नाना पाटेकर यांचा सिनेसृष्टीत झाला प्रवेश, मुलाखतीत सांगितलेला किस्सा - Esakal
Nana Patekar Passes Away : 'या' अभिनेत्रीमुळेच नाना पाटेकर यांचा सिनेसृष्टीत झाला प्रवेश, मुलाखतीत सांगितलेला किस्सा Esakal
3 hours agoNana Patekar Passes Away: नटसम्राट हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी - ABP Majha
Nana Patekar Passes Away: नटसम्राट हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी ABP Majha
4 hours agoNana Patekar Passed Away: 'नटसम्राट'ची अकाली एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन - Pudhari
Nana Patekar Passed Away: 'नटसम्राट'ची अकाली एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन Pudhari
3 hours agoNana Patekar Passes Away : ‘हॅट्स ऑफ टू हिम नाना पाटेकरांसारखा..’ एका वाक्यात नाना... - TV9 Marathi
Nana Patekar Passes Away : ‘हॅट्स ऑफ टू हिम नाना पाटेकरांसारखा..’ एका वाक्यात नाना... TV9 Marathi
3 hours agoNana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, वयाच्या 75 व्या... - TV9 Marathi
Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, वयाच्या 75 व्या... TV9 Marathi
3 hours ago